TRENDING:

GST कपातीनंतर 69 हजारांना मिळतेय TVS Star City Plus! कोणत्या बाइक्सला देते टक्कर?

Last Updated:

GST Reforms 2025: जीएसटी कपातीनंतर, बाईक खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. चला जाणून घेऊया टीव्हीएस स्टार सिटी प्लसची नवीन किंमत काय आहे आणि ती बाजारात कोणाशी स्पर्धा करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जीएसटी कपातीनंतर, दुचाकी खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहे. म्हणून, जर तुम्ही परवडणारी बाईक शोधत असाल, तर टीव्हीएस स्टार सिटी प्लस हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. या बाईकवर आता 28% जीएसटी आणि 1% सेस ऐवजी फक्त 18% जीएसटी आकारला जाईल. यामुळे बाईकच्या एक्स-शोरूम किमतीत अंदाजे ₹8500 ची कपात झाली आहे.
टीव्हीएस  स्टार सीटी प्लस
टीव्हीएस स्टार सीटी प्लस
advertisement

GST कपातीनंतर, नोएडामध्ये TVS Star City Plusची एक्स-शोरूम किंमत ड्रम व्हेरिएंटसाठी ₹69 हजार 300 रुपये आहे. डिस्क व्हेरिएंटची किंमत 72 हजार 900 रुपये पर्यंत कमी करण्यात आली आहे. शहर आणि डीलरशिपनुसार बाईकची ऑन-रोड किंमत बदलू शकते.

Maruti Suzuki ची प्रसिद्ध सेडान कार Dzire किती रुपयांनी स्वस्त झाली? पाहा डिटेल्स

advertisement

TVS Star City Plus फीचर्स

TVS Star City Plus BS-VI अनुरूप आहे आणि त्यात अनेक प्रगत फीचर्स आहेत. या बाईकमध्ये चांगल्या व्हिजिबिलिटीसाठी फुल-LED हेडलॅम्प, इकॉनॉमीमीटर, सर्व्हिस रिमाइंडर, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि यूएसबी चार्जर यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

TVS Star City Plusमध्ये ड्युअल-टोन सीट आणि 5-स्टेप अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अ‍ॅब्झॉर्बर्स आहेत. ज्यामुळे ती लांब राईडसाठी खूप आरामदायी बनते. ही बाईक मोनो-टोन आणि ड्युअल-टोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात स्पोर्टी ड्युअल-टोन मफलर, मिरर आणि ३डी प्रीमियम लोगोसारखे स्टायलिश घटक आहेत.

advertisement

कामाची Bike, कितीही वजन ठेवून पळवा काहीच होणार नाही! रेंज 140 km, किंमतही कमी!

टीव्हीएस स्टार सिटी प्लस पॉवरट्रेन

ही टीव्हीएस बाईक 109.7 cc सिंगल-सिलेंडर इंजिनने सुसज्ज आहे जी 8.08 Hp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची डिझाइन खूपच प्रभावी आहे. त्याची लांबी 1980 mm, रुंदी 750mm, उंची 1080 mm, व्हीलबेस 1260mm आणि ग्राउंड क्लीयरन्स 172mm आहे.

advertisement

या बाईकचे वजन 109 किलो आहे आणि त्याची फ्यूल टँक कॅपेसिटी 10 लिटर आहे. यामध्ये पुढील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 110 mm ड्रम ब्रेक आहे. TVS Star City Plus ही हीरो स्प्लेंडर प्लस, होंडा शाइन आणि बजाज प्लॅटिना सारख्या इतर 110 सीसी बाइक्सशी स्पर्धा करते.

मराठी बातम्या/ऑटो/
GST कपातीनंतर 69 हजारांना मिळतेय TVS Star City Plus! कोणत्या बाइक्सला देते टक्कर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल