कामाची Bike, कितीही वजन ठेवून पळवा काहीच होणार नाही! रेंज 140 km, किंमतही कमी!

Last Updated:

९० च्या दशकात मार्केट गाजवणारी कायनेटिक आता पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.  Kinetic Green ने आताा आपली नवीन  इलेक्ट्रिक टू-व्हीलर...

News18
News18
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणाला आळा घालण्यासाठी ईलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्यासाठी लोकांचा कल वाढला आहे. ९० च्या दशकात मार्केट गाजवणारी कायनेटिक आता पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.  Kinetic Green ने आताा आपली नवीन  इलेक्ट्रिक टू-व्हीलर, ई-लुना प्राइम (e luna prime) लाँच केली आहे. कंपनी भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर क्षेत्रात काम करत आहे.  ई-लुना प्राइम ई-लुना ब्रँडची पोहोच 2W सेगमेंटमध्ये वाढवली आहे.
सध्या मार्केटमध्ये असलेल्या लुनावरच ही e luna prime आधारीत आहे. लाँच झाल्यानंतर काही महिन्यांतच 25,000 हून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे शहरी आणि अर्ध-शहरी भागात वापरकर्ता आधार निर्माण झाला आहे. त्यामुळे 100cc आणि 110cc सेगमेंटमध्ये अशा पर्यायांची मागणी वाढत चालली आहे.
advertisement
ई-लुना प्राइमचे फिचर्स
ई-लुना प्राइममध्ये 16-इंच अलॉय व्हील्स, डिजिटली कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एक चमकदार एलईडी हेडलॅम्प आहे. यात सिंगल सीट, फ्रंट व्हॉयझर, ट्यूबलेस टायर्स आणि उपयुक्त फ्रंट-लोडिंग एरिया आहे. सिल्व्हर फिनिश साइड क्लॅडिंग, रिम टेप आणि बॉडी डेकल्सला एक चांगला लूक देतो. दोन प्रकार मुख्य लाइनअपचा भाग आहेत, प्रत्येकाची रेंज वेगळी आहे. e luna prime पूर्ण चार्ज झाल्यावर ११० किलोमीटर ते १४० किलोमीटर इतकी रेंज देऊ शकते. e luna prime ही ६ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
किंमत किती?
e luna prime ची एक्स-शोरूम किंमत ८२,४९० रुपये इतकी आहे. रनिंग कॉस्ट विश्लेषणानुसार, चार्ज रेट प्रति किलोमीटर १० पैसे इतका आहे आणि मासिक खर्च सरासरी २,५०० रुपये आहे.  त्यामुळे  वार्षिक बचत ६०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जवळजवळ ५० टक्के भारतीय कुटुंबांकडे आधीच दुचाकी आहे. वितरणासाठी कायनेटिक ग्रीन त्याच्या डीलरशिप नेटवर्कवर अवलंबून आहे. ३०० हून अधिक डीलरशिपसह, शहर आणि ग्रामीण भागात कायनेटिक पोहोचलं आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
कामाची Bike, कितीही वजन ठेवून पळवा काहीच होणार नाही! रेंज 140 km, किंमतही कमी!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement