TRENDING:

Auto News: मॅजिकल बटण दाबताच इलेक्ट्रिक स्कूटरची होणार थ्री व्हिलर! हिरोची ही नवी गाडी पाहिली का?

Last Updated:

'एक बटण दाबलं की स्कूटरची कार! दुसरं बटण दाबलं की कारची स्कूटर' अशा गोष्टी या आता फक्त कल्पनेतल्या राहिलेल्या नाहीत, हेच या बातमीवरून स्पष्ट होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ख्रिस्तोफर नोलानचा 'डार्क नाइट' बघितलाय तुम्ही? त्यात बॅटमॅनची कार फक्त एक बटण दाबलं की बाइकमध्ये रूपांतरित होते. ऑटोमोबाइल मार्केटमध्ये रोज नवनवीन शोध लावले जातात आणि नवनवीन गाड्या ग्राहकांसाठी सादर केल्या जातात. टू व्हिलर निर्मितीतील अग्रणी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पच्या मालकीच्या सर्ज या स्टार्टअपकडून आता अशीच कन्व्हर्टिबल गाडी बाजारात सादर करण्यात येत आहे. ‘सर्ज एस 32’ असं तिचं नाव आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
हिरोची हटके गाडी
हिरोची हटके गाडी
advertisement

Auto News : फक्त 500 रुपये देऊन बुक करा जबरदस्त मोपेड! फूल चार्जवर चालेल 110Km

'एक बटण दाबलं की स्कूटरची कार! दुसरं बटण दाबलं की कारची स्कूटर' अशा गोष्टी या आता फक्त कल्पनेतल्या राहिलेल्या नाहीत, हेच या बातमीवरून स्पष्ट होत आहे. हे वाहन इलेक्ट्रिक असेल आणि तीन चाकी असेल. अवघ्या एका बटणाच्या मदतीने तीन चाकी वाहनाचं रूपांतर दुचाकीमध्ये करता येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार स्वयंरोजगार करत असलेल्या व्यक्तींसाठी हे खास वाहन डिझाइन करण्यात आलं आहे. त्यामुळे या व्यक्ती आपल्या इच्छेनुसार हवी तेव्हा तीन चाकी म्हणून आणि हवी तेव्हा दुचाकी म्हणून हे वाहन वापरू शकणार आहेत. आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी या वाहनाचा एक व्हिडिओ आपल्या ‘एक्स’ हँडलवर शेअर केला आहे.

advertisement

तुम्हीही कार चालवता; मग हँडब्रेक कसा वापरायचा माहितीये? जाणून घ्या योग्य पद्धत

‘सर्ज एस 32’ ही गाडी स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी निर्माण करण्यात आली आहे. टू इन वन कन्व्हर्टिबल इलेक्ट्रिक व्हेइकल असं या वाहनाचं स्वरूप आहे. ज्या मोठ्या वाहनांपासून दुचाकी वेगळ्या करता येतात म्हणजेच डिटॅचेबल टू-व्हीलर असलेल्या मोठ्या वाहनांप्रमाणे तिचं डिझाइन करण्यात आलं आहे. अशा प्रकारची वाहनं आतापर्यंत फक्त काल्पनिक सिनेमात पाहिलेली असल्यामुळे कल्पनेतलं जग प्रत्यक्षात आल्याची भावना वाहन उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींमध्ये आहे.

advertisement

अवघ्या एका बटणावर ‘सर्ज एस 32’ हे वाहन हवं तेव्हा इलेक्ट्रिक तीन चाकी रिक्षा आणि हवं तेव्हा दुचाकी म्हणून बदलत असल्यामुळे वाहन चालक व्यवसाय आणि व्यक्तिगत वापरासाठी या वाहनाची सांगड घालू शकतील असं कंपनीने म्हटलं आहे. विशेष म्हणजे फक्त तीन मिनिटांमध्ये या वाहनाचं ईव्ही रिक्षा ते ईव्ही स्कूटर असं रूपांतर करणं शक्य आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसाय केल्यानंतर दुचाकीमध्ये तिचं रूपांतर करुन ती व्यक्ती आपल्या घरी किंवा इतर ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळेच कंपनीने या वाहनाला ‘क्लास शिफ्टिंग व्हेइकल’ असंही म्हटलं आहे. पहिल्या नजरेत ‘सर्ज एस 32’ हुबेहूब एखाद्या इलेक्ट्रिक रिक्षासारखी दिसते. हेडलाइट, विंडस्क्रीन, इंडिकेटर, वायपर्स, ड्रायव्हर आणि पॅसेंजर केबिन अशीच तिची रचना आहे. पावसापासून रक्षण करण्यासाठी सॉफ्ट आणि वेगळे काढता येणारे दरवाजेही दिले जाण्याची शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Auto News: मॅजिकल बटण दाबताच इलेक्ट्रिक स्कूटरची होणार थ्री व्हिलर! हिरोची ही नवी गाडी पाहिली का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल