तुम्हीही कार चालवता; मग हँडब्रेक कसा वापरायचा माहितीये? जाणून घ्या योग्य पद्धत
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
तुम्हीही चारचाकी गाडी वापरताना हँडब्रेकचा वापर करत असलात, तर हँडब्रेकचा वापर कसा करावा, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
मुंबई : प्रत्येक चारचाकी गाडीला हँडब्रेक असतो. कार सुरक्षित ठेवण्यासाठी हा हँडब्रेक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो; पण गाडीचा हँडब्रेक लावताना काळजी घेतली नाही, तर गाडीचं नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे हँडब्रेकचा वापर कसा करावा, हे प्रत्येक वाहनचालकाला माहिती असणं गरजेचं असून, हँडब्रेक लावण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे, याबाबत जाणून घेऊ या.
ऑटोमोबाइल कंपन्या कार किंवा एसयूव्हीमध्ये दोन प्रकारचे ब्रेक देतात. त्यापैकी एक ब्रेक पायांनी लावला जातो, तर दुसरा ब्रेक हाताने लावला जातो. हाताने वापरल्या जाणाऱ्या ब्रेकला हँडब्रेक म्हणतात. अनेकदा कारचालक चुकीच्या पद्धतीनं हँडब्रेक लावतात. त्यामुळे त्यांना जोरदार धक्का बसतो व कधीकधी गंभीर दुखापतही होते.
advertisement
तुम्हीही चारचाकी गाडी वापरताना हँडब्रेकचा वापर करत असलात, तर हँडब्रेकचा वापर कसा करावा, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ऑटो एक्सपर्ट राजा यांनी हँडब्रेक वापराबाबत सांगितलेल्या टिप्स जाणून घेऊ या. त्या नक्कीच उपयुक्त ठरतील.
ऑटो एक्सपर्ट राजा यांच्या मते, गाडीचा हँडब्रेक आवश्यकतेनुसार वापरायला हवा. गाडी चालवताना तुम्हाला अडचण येत नसेल, तर हँडब्रेक वापरणं टाळलं पाहिजे. हँडब्रेक नेमका कसा व कधी वापरावा, ते जाणून घेऊ.
advertisement
असा वापरा हँडब्रेक
गाडीच्या हँडब्रेकचा वापर सावकाश आणि काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तसंच हँडब्रेक पूर्णपणे लावावा, जेणेकरून कार हलणार नाही. तसंच कार सुरू करण्यापूर्वी नेहमी हँडब्रेक काढणं गरजेचं आहे. हँडब्रेकचा योग्य वापर करून, तुम्ही तुमची कार सुरक्षित ठेवू शकता व अपघात टाळू शकता.
advertisement
हे लक्षात ठेवा
चालत्या कारला हँडब्रेक लावणं खूप धोकादायक ठरू शकते. कारण त्यामुळे कार नियंत्रणाबाहेर जाऊन अपघात होऊ शकतो. तसंच कार जास्त वेळ पार्क करायची असेल, तर अशा वेळीही हँडब्रेक लावू नये. अन्यथा यामुळे ब्रेक पॅड खराब होऊ शकतात. तसंच हँडब्रेक पूर्णपणे लावला गेला नाही तर कार पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातही होऊ शकतो.
advertisement
हँडब्रेकचा वापर कधी करावा?
कार पार्क करताना हँडब्रेक लावल्यास तुमची गाडी पुढे किंवा मागे जाणार नाही व सुरक्षित राहील. याशिवाय गाडी उतारावर उभी असल्यास हँडब्रेक लावणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे तुमची गाडी एका जागेवर थांबेल. तसंच तुम्ही कार पार्क केल्यानंतर, कारचं इंजिन बंद केल्यानंतर हँडब्रेक लावणं आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा कार सुरू करणं सोयीस्कर होईल. तसंच तुम्ही गाडीला रेलिंग बांधत असाल तर हँडब्रेक लावणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 28, 2024 9:01 AM IST