महिंद्रा ‘थार’सह अनेक एसयूव्ही गाड्यांवर लिहिलेलं 4X4 नक्की आहे तरी काय?

Last Updated:

महिंद्रा थारसारख्या एसयूव्ही गाड्यांवर 4X4 असं लिहिलेलं तुम्ही वाचलंय का?

News18
News18
मुंबई : भारतात ऑटोमोबाईल मार्केट हे सतत अपडेट होत असलेलं मार्केट आहे. इथल्या रस्त्यांवर नवनवीन गाड्या धावताना दिसतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा यांना पुरे पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्याही प्रयत्नांची पराकाष्ठा करतात.
आपल्या कंपनीकडून तयार होणाऱ्या कार्समध्ये सगळी एकापेक्षा एक अद्ययावत फीचर्स असलेल्या कार असाव्यात असाही त्यांचा प्रयत्न असतो. ‘एसयूव्ही’ श्रेणीतील कार सध्या ग्राहकांच्या विशेष पसंतीच्या असल्याचं दिसून येतं. महिंद्रा थारसारख्या एसयूव्ही गाड्यांवर 4X4 असं लिहिलेलं तुम्ही वाचलंय का?
एसयूव्ही कारमध्ये 16 सीट नसतात आणि 16 चाकंही नसतात. मग यांना 4X4 का म्हणतात? या 4X4 चा अर्थ अगदी अशा गाड्या चालवणाऱ्यांनाही माहिती नसतो. आपण जाणून घेऊया हे 4X4 म्हणजे नक्की असतं तरी काय?
advertisement
1 - महिंद्रा थार ऑफरोडर एसयूव्ही आणि तशाच इतरही काही गाड्यांवर 4X4 असं लिहिलेलं असतं. 4X4 हा उल्लेख गाडीच्या सीट्स किंवा चाकांची संख्या यांच्याशी नाही तर ड्रायव्हिंग सिस्टिम आणि इंजिनशी संबंधित असतो. सहसा वॅगनआर, अल्टो, नेक्सॅान, ब्रेझा या गाड्यांमध्ये 4X4 ही सिस्टिम नसते. त्यांच्यासाठी वापरली जाणारी सिस्टिम ही 4X2 म्हणून ओळखली जाते. या गाड्या टू व्हिल ड्राईव्ह सिस्टिमवर आधारित असतात. थोडक्यात सांगायचं तर या गाड्यांचं इंजिन फक्त दोन चाकांनाच पॅावर देतं.
advertisement
2 - 4X4 गाड्यांमध्ये मात्र इंजिनाकडून चारही चाकांना पॅावर दिली जाते. म्हणजेच या गाड्यांची चारही चाकं इंजिनाशी जोडलेली असतात.
3 - 4X4 ड्रायव्हिंग सिस्टिम ही साधारणपणे मोठ्या गाड्यांमध्ये असते. महिंद्रा थार किंवा जीपसारख्या ऑफरोड ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या गाड्यांमध्ये 4X4 ही प्रणाली दिली जाते. तिचा उपयोग काय? तिचं महत्त्व काय? का घ्यायच्या असतात लोकांना 4X4 गाड्या?
advertisement
4 - ज्यांना ऑफरोड ड्रायव्हिंगची आवड आहे त्यांच्यासाठी 4X4 सिस्टिम असलेल्या गाड्या उपयोगी ठरतात. रस्ते नसलेल्या ठिकाणी, डोंगर-दरी सारख्या भौगोलिक प्रदेशात या गाड्या चालवणं 4X4 मुळे सोपं जातं. पुढच्या आणि मागच्या चाकांनाही इंजिन पॅावर देत असल्यामुळे ऑफरोड ड्रायव्हिंगमध्ये या गाड्या कंट्रोल करणं सोपं जातं. ॲडव्हेंचर म्हणून गाडी चालवणाऱ्यांकडून 4X4 सिस्टिम असलेली गाडी खरेदी करण्यास पसंती दिली जाते.
advertisement
5 - सध्या भारतात काही महागड्या श्रेणीतील गाड्यांमध्ये 4X4 सिस्टिम देण्यात आलेली आहे. महिंद्रा थार, मारुती सुझुकी जिम्नी, टोयोटा फॅार्च्युनर, महिंद्रा स्कॅार्पियो एन, फोर्स गुरखा, एमजी ग्लॉस्टर आणि जीप कंपास या एसयूव्ही 4X4 सिस्टिमसह उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या/ऑटो/
महिंद्रा ‘थार’सह अनेक एसयूव्ही गाड्यांवर लिहिलेलं 4X4 नक्की आहे तरी काय?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement