इंजिन स्टार्ट करण्याची चूक करू नका
बहुतेक लोक सर्वात आधी कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण हा मोठा धोका आहे. पाणी इंजिनच्या सिलेंडर, फ्युएल सिस्टम किंवा एग्झॉस्टमध्ये गेलेले असू शकते. जर तुम्ही कार स्टार्ट केली तर इंजिन हायड्रोलॉक होऊ शकते आणि पूर्णपणे खराब होऊ शकते. म्हणूनच कार बंदच ठेवा, बॅटरी काढून टाका आणि एखाद्या चांगल्या मेकॅनिकला बोलावून तपासणी करून घ्या.
advertisement
पेट्रोल पंपाचा रस्ताच विसराल! या आहेत भारतातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार
गाडीचे इंटरनल पार्ट तपासा
पाणी गाडीच्या आतपर्यंत गेले असेल, तर एअरबॅग, सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमला नुकसान होऊ शकते. सर्वात आधी कारचे इंटीरियर तपासा आणि ओले मॅट, सीट कव्हर किंवा एक्स्ट्रा सीट्स बाहेर काढा जेणेकरून आत ओलावा पसरू नये. त्याचबरोबर कारच्या आतल्या फोटों काढणेही महत्त्वाचे आहे, कारण हे फोटो इन्शुरन्स क्लेममध्ये उपयोगी पडतात.
पाणी काढा आणि लगेच वाळवा
गाडीच्या आत पाणी जास्त वेळ राहणे हे सगळ्यात धोकादायक आहे. यामुळे दुर्गंधी, बुरशी आणि ओलावा पसरतो. शक्य तितक्या लवकर बादली, स्पॉन्ज किंवा व्हॅक्यूमच्या मदतीने पाणी काढा. दरवाजे आणि खिडक्या उघडा जेणेकरून हवा खेळती राहील. सीट आणि कार्पेट टॉवेलने पुसा आणि गरज पडल्यास फॅन किंवा डिह्यूमिडिफायर वापरा जेणेकरून ओलावा पूर्णपणे निघून जाईल.
Hyundai Creta चं मार्केट करणार जाम, येतेय जर्मन कंपनीची पॉवरफुल SUV, सेफ्टीमध्ये टँकच!
इलेक्ट्रॉनिक्सपासून दूर रहा
आजकालच्या कार पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक सिस्टमवर अवलंबून असतात. किंचित ओलावाही वायरिंग, सेन्सर किंवा टचस्क्रीन डिस्प्ले खराब करू शकतो. त्यामुळे घाईघाईत लाइट, एसी किंवा म्युझिक सिस्टम सुरू करू नका. आधी एखाद्या प्रोफेशनलकडून तपासणी करून घ्या, त्यानंतरच इलेक्ट्रिकल फीचर्स वापरा.
मेकॅनिक आणि इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा
जेव्हा सुरुवातीची पावले पूर्ण होतील, तेव्हा गाडीची तज्ज्ञ मेकॅनिककडून तपासणी करून घेणे सर्वात आवश्यक आहे. इंजिन, ब्रेक, गिअरबॉक्स आणि फ्युएल लाइन्स तपासून घ्या, जेणेकरून गाडी दुरुस्त होईल की पूर्णपणे बदलावी लागेल हे कळेल. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपनीशी लगेच बोला. क्लेमसाठी डॉक्युमेंट्स, फोटो आणि रिपेअरचा अंदाज खूप मदत करतात.
पाऊस आणि पूराचा गाड्यांवर होणारा परिणाम अत्यंत धोकादायक असू शकतो. वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर एक विश्वासार्ह कारसुद्धा सुरक्षेसाठी धोका बनू शकते. म्हणूनच मान्सूनमध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे. गाडी पाण्यात अडकली तर हे सोपे उपाय अवलंबून तुम्ही केवळ तुमची गाडीच वाचवू शकत नाही, तर मोठा खर्चही टाळू शकता.