Hyundai Creta चं मार्केट करणार जाम, येतेय जर्मन कंपनीची पॉवरफुल SUV, सेफ्टीमध्ये टँकच!
- Published by:Sachin S
Last Updated:
हुंदईची क्रेटा ही सर्वाधिक लोकप्रिय अशी SUV ठरली आहे. अजूनही क्रेटाचा भारतीय मार्केटमध्ये चांगलाच बोलबाला आहे. आता अशातच
मागील अनेक वर्षांपासून दक्षिण कोरियन कंपनी हुंदईने भारतीय मार्केटमध्ये एकापेक्षा एक कार लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. हुंदईची क्रेटा ही सर्वाधिक लोकप्रिय अशी SUV ठरली आहे. अजूनही क्रेटाचा भारतीय मार्केटमध्ये चांगलाच बोलबाला आहे. आता अशातच जर्मन कंपनी असलेल्या volkswagen हुंदईच्या क्रेटाला टक्कर देण्यासाठी दमदार अशी एसयूव्ही आणण्याच्या तयारीत आहे.
२०२१ मध्ये फोक्सवॅगनने त्यांच्या इंडिया २.० प्रोजेक्ट अंतर्गत MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित टायगून लाँच करून मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश केला. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे तिच्या व्यावहारिक आणि कॉम्पॅक्ट डिझाइन, प्रीमियम ब्रँड अपील आणि सुरक्षिततेसाठी कौतुक केलं गेलं आहे. जवळजवळ ४ वर्षांनंतर, फोक्सवॅगन volkswagen taigun 2026 च्या सुरुवातीला पहिले मिडलाइफ अपडेट मिळणार आहे.
advertisement

volkswagen taigun 2026 कशी असेल?
लीक झालेल्या फोटोमुळे volkswagen taigun 2026 च्या डिझाइनशी संबंधित तपशील अजूनही काही समोर आली नाही. पण volkswagen taigun 2026 मध्ये नवीन फ्रंट आणि रियर बंपर तसंच नव्याने डिझाइन केलेले हेडलॅम्प आणि टेललॅम्प असण्याची शक्यता आहे. तसंच, शीट मेटलमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यामध्ये इंजिन १.० लीटर TSI पेट्रोल इंजिन, ११५ बीएचपी पॉवर, १७५ एनएम आणि गियरबॉक्स ६-स्पीड एमटी असं असण्याची शक्यता आहे. तर दुसरा पर्याय हा १.५ लीटर TSI पेट्रोल इंजिन, पॉवर १५० बीएचपी टॉर्क २५० एनएम आणि ६-स्पीड एमटी/७-स्पीड डीसीटी असण्याची शक्यता आहे.
advertisement
फिचर्स काय काय?
फोक्सवॅगन नवीन टायगनमध्ये एडीएएस (ऑटोनोमस ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) सूट आणि ३६०-डिग्री कॅमेरा असू शकतो. एसयूव्हीमध्ये नवीन अपहोल्स्ट्री आणि ट्रिमसह नवीन केबिन थीम देखील मिळू शकते. सध्याच्या मॉडेलमध्ये इतर फिचर्सचा समावेश असेल, ज्यामध्ये लेदरेट आणि फॅब्रिक सीट, ऑटो डिमिंग IRVM, १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto वायरलेस चार्जिंग, टू टाइप-सी सॉकेट्स ८-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. तसंच ड्रायव्हर सीट अडजेस्टमेंट, इलेक्ट्रिक सनरूफ, लेदर इन्सर्टसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल स्टार्ट असिस्टसह ६ एअरबॅग्ज असण्याची शक्यता आहे.
advertisement
इंजिन आणि पॉवर
view commentsvolkswagen taigun 2026 फेसलिफ्टमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह १.० लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवण्याची शक्यता आहे. अशी चर्चा आहे की, सध्याचा ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, जो फक्त १.० लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे, तो नवीन ८-स्पीड युनिटने बदलला जाऊ शकतो. १.० लीटर TSI इंजिन ११५bhp आणि १७८Nm टॉर्कची दावा केलेली पॉवर आणि मोठ्या क्षमतेची TSI मोटर १५०bhp आणि २५०Nm टॉर्क निर्माण करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2025 8:59 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai Creta चं मार्केट करणार जाम, येतेय जर्मन कंपनीची पॉवरफुल SUV, सेफ्टीमध्ये टँकच!


