महायुती सरकारने तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. पहिली अंतिम तारीख एप्रिल, त्यानंतर जून आणि तिसऱ्यांदा 15 ऑगस्टपर्यंत (hsrp last date to apply) मुदतवाढ देण्यात आली होती. आता फक्त 20 दिवस उरले असताना, तज्ज्ञांचे मत आहे की उरलेल्या 25 लाखांहून अधिक वाहनांवर प्लेट बसवणे अवघड आहे. त्यामुळे सरकार आणखी मुदतवाढ देणार का की 15 ऑगस्टनंतर थेट कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
advertisement
मग अशा परिस्थीतीत ज्या लोकांनी अद्याप रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांनी काय करावं किंवा त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का? (hsrp online registration)
तुमच्या गाडीला HSRP आता काही तासात लावणे तर शक्य नाही. यासाठी आता तुमच्याकडे एकच पर्याय उरला. तो म्हणजे तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत वाहानाचं रजिस्ट्रेशन तरी करावं लागेल. एकदा का रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला प्लेट लावण्यासाठी अपॉइंटमेंट मिळेल. मग त्या तारखेला जाऊन तुम्ही HSRP प्लेट बसवू शकता.
यासाठी तुम्ही ट्राफिक पोलिसांना तुमच्या रजिस्ट्रेनची पावती दाखवून काही दिवसांसाठी दंडापासून सुटका मिळवू शकता. पण हो यासाठी तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत रजिट्रेशन करणं गरजेचं आहे आणि पैसे भरल्यावर त्याची पावती मिळणं ही गरजेचं आहे.
अर्ज कसा करावा? यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पर्याय आहेत. (how to apply hsrp number plate)
ऑनलाइन अर्ज कसा करावा:
- वेबसाइटला भेट द्या: BookMyHSRP.com या वेबसाइटला भेट द्या.
- वाहनाची माहिती भरा: आपल्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि इतर आवश्यक माहिती भरा. (BookMyHSRP.com वेबसाइटनुसार)
- फिटमेंट सेंटर निवडा: आपल्या पसंतीचे फिटमेंट सेंटर निवडा, जिथे तुम्ही HSRP प्लेट बसवू इच्छिता.
- भरणा करा: HSRP प्लेटची किंमत आणि फिटमेंट शुल्काचा भरणा करा.
- अपॉइंटमेंट बुक करा: HSRP प्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा.
- प्लेट बसवा: अपॉइंटमेंटच्या दिवशी, आपले वाहन निवडलेल्या फिटमेंट सेंटरवर घेऊन जा आणि HSRP प्लेट बसवा.
RTO मध्ये अर्ज कसा करावा:
- RTO कार्यालयाला भेट द्या: आपल्या जवळच्या RTO कार्यालयात जा.
- अर्ज फॉर्म मिळवा: RTO कार्यालयातून HSRP साठी अर्ज फॉर्म घ्या.
- अर्ज फॉर्म भरा: अर्ज फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरा.
- दस्तऐवज जमा करा:
आपल्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा असे आवश्यक दस्तऐवज जमा करा.
- भरणा करा: HSRP प्लेटची किंमत आणि इतर आवश्यक शुल्काचा भरणा करा.
- प्लेट बसवा: HSRP प्लेट मिळाल्यानंतर ती आपल्या वाहनावर बसवा.