राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य केली. या निर्णयामागे वाहतुकीचं सुरक्षीत आणि पारदर्शक नियमन हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने यापूर्वी 30 जून पर्यंतची मुदत दिली होती, सगळ्या अडचणी लक्षात घेता अंतिम मुदत वाढवून 15 ऑगस्ट करण्यात आली आहे.
FASTag Annual Pass Rules: 3000 रुपयांत फक्त 200 ट्रिप फ्री, त्या संपल्यावर पुढे काय?
advertisement
या कालावधीत जर वाहनावर HSRP बसवलेली नसेल, तर वाहतूक पोलीस आणि वायुवेग पथक थेट कारवाई करतील. ही कारवाई दंडात्मक असण्याची शक्यता असून वाहन मालकांवर आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे ही वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अजूनही नंबर प्लेट बसवून घेतली नसेल तर अर्ज करा आणि 10 हजार रुपये वाचवा.
HSRP म्हणजे काय, आणि ती इतकी महत्त्वाची का आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात असू शकतो. ही एक सुरक्षित आणि युनिक नंबर प्लेट असते जी केवळ सरकारमान्य वितरकांकडूनच बसवली जाते. प्रत्येक वाहनासाठी एक विशिष्ट कोड यामध्ये असतो. यामुळे चोरी झालेल्या वाहनांची ओळख पटवणे सोपे होते, बनावट नंबर प्लेट्स टाळता येतात आणि वाहनाला स्कॅन करुन एका झटक्यात त्याची माहिती मिळते.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 3000 रुपयांच्या Fastag टोल पासचा तुम्हाला लाभ घेता येणार का?
यासाठी वाहनधारकांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर transport.maharashtra.gov.in जाऊन अपॉइंटमेंट बुक करावी लागते. एकदा अपॉइंटमेंट मिळाली, की ती 15 ऑगस्टपूर्वीची असल्यास, तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. 15 ऑगस्टपासून मात्र तुमच्या वाहनावर नंबर प्लेट नसेल तर वाहन थांबवून तुमची चौकशी केली जाऊ शकते. ही कारवाई टाळण्यासाठी आजच या वेबसाईटवर भेट देऊन अपॉईंटमेंट बुक करायला विसरू नका. नाहीतर दंड भरायला तयार राहा.