कोल्हापूर : बॉबी राजदूत.. नाव ऐकलं की समोर येतं ती कमी उंची.. दोन टायर्स सोबत एक स्टेफनी असणारी आणि एकेकाळी अख्ख्या देशाला अक्षरशः वेड लावणारी बाईक.. तसं म्हणायला गेलं तर त्याकाळी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्राला वेग मिळाला होता. सत्तरच्या दशकात येझडी आणि रॉयल एनफिल्ड या विदेशी कंपन्यात भारतात जम बसवण्याचा प्रयत्न करत होत्या. या सगळ्यात अशी एक विदेशी बाईक आली जी लोकांना प्रचंड भावली. त्या काळातील मोठे अभिनेते, क्रिकेटर्स या बाईकवर राईड करायचे.. इतकेच नव्हे तर 1973 मध्ये आलेल्या बॉबी चित्रपटामुळे या बाईकला बॉबी राजदूत असं म्हटलं जायचं.
advertisement
बॉबी या चित्रपटात एव्हरग्रीन अभिनेते ऋषी कपूर यांनी या राजदूतची सवारी केली होती. त्यानंतर तरुणांमध्येही या बाईकची क्रेझ वाढू लागली. त्याकाळी या बाईकच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात ही बॉबी राजदूत पाहायला मिळाली. या प्रदर्शनात सुनील भगवान आणि कोल्हापुरातील रवींद्र पाटील यांनी ही बॉबी राजदूत घेऊन प्रदर्शनात सहभाग घेतला. या गाडीमुळे पुन्हा एकदा बॉबी राजदूतच्या क्रेझ बद्दल त्यांच्याकडून ऐकायला मिळालं.
कोल्हापूरच्या रस्त्यावर 'ती' परत अवतरली, गाजवलं होतं 80 चं दशक, आजही कुणी करणार नाही बरोबरी!
या गाडीला तोड नाही..!
पुण्यातील सुनील भगवान हे बॉबी राजदूत घेऊन प्रदर्शनानिमित्त पुण्याहून कोल्हापूरला या गाडीवरून आले. आजही मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणाऱ्या गाड्या उपलब्ध आहेत. मात्र या गाडीला तोड नाही, असं ते म्हणतात. त्यांनी या गाडीवरून जवळपास 25 ते 30 हजार किलोमीटर पर्यंत प्रवास केला आहे.
एकदम टॉपचा विषय..!
कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात राहणारे रवींद्र पाटील यांची बॉबी राजदूत गाडी आहे. ते या प्रदर्शनात सहभागी झाले होते. त्यांनी या गाडीवरून दोन ते तीन वेळा गोव्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्याचबरोबर ते रायडिंगसाठी या बॉबी राजदूत गाडीचाच वापर करतात. जवळपास ते 10 ते 12 हजार किलोमीटर पर्यंत त्यांनी या गाडीवरून प्रवास केलेला आहे. ही गाडी वापरण्यात एकदम टॉपचा विषय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
बॉबी राजदूत का आहे खास?
1973 मध्ये आलेल्या बॉबी चित्रपटामध्ये एखाद्या मोठ्या पडद्यावर मोटर सायकलवर एक तरुण हिरो आणि हिरोईन बसल्याचं पाहून चित्रपट चाहत्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव होता. कारण त्याकाळी बरेच चित्रपट हे मारहाणीच्या शैलीमध्ये बनवले जात होते.. पण हीरो हीरोइन रोमँटिक स्टाईलने तेही एका बाईकवर बसल्याचं पाहायला मिळणं त्या काळच्या प्रेक्षक वर्गाला थोडा वेगळा अनुभव होता. म्हणून या बाईकची अख्ख्या देशभरात क्रेझ होती.
या मोटारसायकलमध्ये 173 सीसी टू स्ट्रोक इंजिन होते. जे 7.5 बी एच पी चे पावर आणि 12.7n चे टॉर्क जनरेट करत होते. बाईक मध्ये बसण्यासाठी फारसे आरामदायक सीट नव्हती पण राजदूत जीटीसी 175 ची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती. अनेकांना या बाईकने अक्षरशः वेड लावले होते. बबन चित्रपटात या बाईकच्या एन्ट्रीने बाईकच्या विक्रीत उसळी आल्याचं पाहायला मिळालं. या बाईक मध्ये एक स्टेफनी लावण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याकाळी हे तिसरे चाक कोणत्याही मोटारसायकलमध्ये दाखवण्यात आलं नव्हतं.