TRENDING:

Thar आता विसरा, महिंद्रा आणतेय Bolero नव्या रुपात, लूकमुळे मार्केटमध्ये धुरळा! 

Last Updated:

महिंद्रा आपली ऑल टाइम फेव्हरेट अशी बोलेरो नव्या ढंगात आणि नव्या रंगात लाँच करणार आहे. या बोलेरोची चाचणी सध्या सुरू आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतातील कार आणि मालवाहू वाहन उत्पादन कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने मागील काही दिवसांमध्ये अनेक अशा दमदार वाहनं लाँच करून एकच धुरळा उडवून दिला. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही हायटेक कार लाँच करून मार्केटमध्ये जरब बसवला आहे. अशातच आता महिंद्रा आपली ऑल टाइम फेव्हरेट अशी बोलेरो नव्या ढंगात आणि नव्या रंगात लाँच करणार आहे. या बोलेरोची चाचणी सध्या सुरू आहे.
News18
News18
advertisement

महिंद्राची बोलेरो ही ग्रामीण भागातील आलिशान एसयूव्ही ठरली आहे. पण आता हीच बोलेरो आपली ओळख पुसणार आहे. कारण, बोलेरो ही एखाद्या आलिशान एसयूव्ही सारखी लाँच होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नव्या बोलेरोचे फोटो काही लिक झाले आहे. या फोटोवरून बोलेरोमध्ये अनेक मोठे बदल झाल्याचं पाहण्यास मिळत आहे.

नवी बोलेरोमध्ये काय असणार? 

advertisement

नव्या बोलेरोमध्ये अनेक छोटेमोठे बदल केल्याचं फोटोवरून स्पष्ट दिसत आहे. आपल्या बॉक्स स्टाइल डिझाइन असलेल्या बोलेरोची ओळख आता नवीन असणार आहे. नवीन बोलेरोची साइड प्रोफाइल आणखी मस्कुलर झाली आहे.  फ्लॅट बोनट सुद्धा पाहण्यास मिळाला आहे. या शिवाय नवी  राउंड शेपमधील एलईडी हेडलॅम्प्स दिले आहे.  फ्रंटमध्ये वर्टिकल स्लॅट ग्रिल दिली आहे, त्यामुळे बोलेरो ही आधीच्या बोलेरोपेक्षा वेगळी दिसणार आहे. मागच्या बाजूला मात्र प्लेन डिझाइन आहे. ज्यामध्ये व्हर्टिकल प्लेस्ड टेललॅम्प्स दिले आहे. मागच्या दारावर थार सारखं स्पेअर व्हिल सुद्धा पाहण्यास मिळेल, अशी शक्यता आहे.

advertisement

नवीन बोलेरोमध्ये सेफ्टी फिचर्सची कोणतीही कमी नसणार आहे. ६ एअरबॅग्स आणि इतर सेफ्टी फिचर्ससही ही बोलेरो लेस असेल. यामध्ये ORVMs,फ्लश-टाइप डोअर हँडल्स आणि मोठे टायर्स सुद्धा दिले आहे. ही एक रफ अँड टफ SUV च्या रुपाने पाहण्यास मिळेल. शहरात आणि हायवेवरही ही एसयूव्ही वापरता येईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन बोलेरो ही नव्या NFA प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. नवीन मॉडेल  पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये येईल. पण कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  किंमतीबद्दल  2026 Mahindra Bolero  भारतात 10 लाख रुपयांपासून सुरू होईल. लवकरच महिंद्राकडून नव्या बोलेरोची झलक पाहण्यास मिळणार आहे. याच वर्षा अखेरीस ही बोलेरो लाँच केली जाईल, अशी शक्यता आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Thar आता विसरा, महिंद्रा आणतेय Bolero नव्या रुपात, लूकमुळे मार्केटमध्ये धुरळा! 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल