मंगळवेढा तालुक्यातील अनवली गावात राहणाऱ्या अमोल मेटकरी यांनी अर्ध्या एकरामध्ये गुलाबांची लागवड केली. गुलाबांची रोपे लागवड करत असताना त्यांनी आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये बॉल सुंदरी या बोरांची झाडांची लागवड केली. शेतीची मशागत करून बारा बाय आठ वर या बॉल सुंदरी बोरांच्या झाडांची लागवड मेटकरी यांनी केली आहे.
उत्पादन वाढवण्यासाठी शेतीत करताय रासायनिक खतांचा वापर, वेळीच व्हा सावध, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम
advertisement
या बोरांची मागणी मुंबई, पुणे या ठिकाणी असून बाजारात 50 ते 60 रुपये किलो दराने या बोरांची विक्री होत आहे. अर्ध्या एकरामध्ये जवळपास 250 पेक्षा जास्त रोपांची लागवड अनंत मेटकरी यांनी केली आहे. तर बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड करण्यासाठी अर्ध्या एकरासाठी अनंत मेटकरी यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च आला आहे. तर बोरांच्या विक्रीतून त्यांना जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणार असल्याची माहिती मेटकरी यांनी दिली.
अनंत मेटकरी हे पारंपरिक पिके न घेता शेतीमध्ये विविध प्रयोग करत शेती करत असतात. त्यांनी केलेली शेती पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह, सांगली, लातूर, धाराशिव आणि इतर जिल्ह्यातून शेतकरी अनंत मेटकरी यांच्या शेतात भेट देण्यासाठी येत असतात. गुलाबांच्या फुलातून मिळालेल्या उत्पन्नातूनच अनंत मेटकरी यांनी या बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे लक्ष न देता शेतीमध्ये विविध प्रयोग करत शेती केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला प्रयोगशील शेतकरी अनंत मेटकरी यांनी दिला आहे.





