महिंद्राने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या वाहनांची घोषणा केली होती आणि फेब्रुवारीमध्ये त्यांच्या किमती जाहीर केल्या होत्या. मात्र, ही सूट 20 डिसेंबरपर्यंत ही वाहने खरेदी करणाऱ्या 5,000 ग्राहकांनाच उपलब्ध असेल. ही ऑफर फक्त पहिल्या 5,000 ग्राहकांसाठीच व्हॅलिड असेल.
EV वर ₹1.55 लाख सूट
महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार, BE 6 आणि XEV 9e वर 20 डिसेंबरपर्यंत सूट उपलब्ध आहे. महिंद्राचे डीलर्स ₹30,000 किमतीचे अॅक्सेसरीज, ₹25,000 किमतीचे कॉर्पोरेट डिस्काउंट आणि ₹30,000 किमतीचे एक्सचेंज डिस्काउंट देत आहेत. या कारमध्ये 7.2 kW AC फास्ट चार्जर देखील आहे.ज्याची किंमत ₹50,000 आणि ₹20,000 किमतीचे फ्री पब्लिक चार्जिंग आहे. एकत्रितपणे, हे एकूण ₹1.55 लाख सूट देते.
advertisement
कारचे हे पार्ट्स नेहमी शोरुममध्ये लावा! 99% लोक करतात मोठी चूक
या कार महिंद्र EV शी स्पर्धा करतात
महिंद्र BE 6 ची एक्स-शोरूम किंमत ₹18.9 लाख पासून सुरू होते. टॉप व्हेरिएंट ₹26.9 लाख पर्यंत जाते. ही कार 59 kWh बॅटरी पॅकसह 556 किमी आणि 79 kWh बॅटरी पॅकसह 682 किमीची रेंज देण्याचा दावा करते. Hyundai Creta Electric ही तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी आहे.
ब्रेक फेल होण्यापूर्वी कार देते 'ही' वॉर्निंग! दुर्लक्ष केल्यास वाढेल धोका
महिंद्रा XEV 9e ची एक्स-शोरूम किंमत 21.9 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 30.5 लाख रुपयांपर्यंत जाते. या EV मधील 59 kWh बॅटरी पॅक 542 किमीची रेंज देते आणि 79 kWh बॅटरी पॅक एका चार्जवर 656 किमीची रेंज देते. महिंद्रा XEV 9e ची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी टाटा हॅरियर EV आहे.
