Maruti Ertigaची किंमत किती आहे?
मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजीची किंमत 10.78 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीहून खरेदी केली तर तुम्हाला या कारवर 1 लाख 12 हजार 630 रुपये आरसी शुल्क आणि 40 हजार 384 रुपये विमा रक्कम भरावी लागेल. याशिवाय, 12 हजार 980 रुपयांचा अतिरिक्त शुल्क समाविष्ट आहे. अशाप्रकारे, एर्टिगाची एकूण ऑन-रोड किंमत 12 लाख 43 हजार 994 रुपये होते.
advertisement
E20 Petrol: इथेनॉल मिक्स पेट्रोलमुळे मायलेज होतं कमी? इंजनही होईल खराब? तुमच्या प्रश्नांची उत्तरं
दरमहा किती EMI भरावा लागेल?
तुम्ही 12.43 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीवर 1 लाख डाउन पेमेंट भरले तर त्यानुसार तुम्हाला 11 लाख 43 हजार 994 रुपयांचे कार कर्ज घ्यावे लागेल. अशाप्रकारे, तुम्हाला दरमहा 24 हजार 306 रुपयांचे एकूण 60 हप्ते 10 टक्के वार्षिक व्याजदराने भरावे लागतील. एकूण, तुम्हाला व्याज म्हणून 3,14,396 रुपये द्यावे लागतील.
Maruti Suzuki Ertigaची फीचर्स
एर्टिगाचा सीएनजी प्रकार प्रति किलो सुमारे 26.11 किमी मायलेज देतो. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे इंजिन 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. मारुती सुझुकी एर्टिगाच्या फीचर्सविषयी बोलायचे झाले तर, ही कार बाजारात एक उत्कृष्ट एमपीव्ही मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे.
आता नाव नाही ठेवायचं! KTM ने आणली स्वस्तात पॉवरफुल BIKE, किंमत पाहून लगेच कराल बूक!
मारुती एर्टिगाचे इंजिन 101.64 बीएचपीची कमाल पॉवर आणि 136.8 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देखील आहे. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर 20.51 किमी मायलेज देखील देते.