काही लोक सोयीसाठी DL आणि RC चे फोटो मोबाईलमध्ये सेव्ह ठेवतात, पण ट्रॅफिक पोलिस हे फोटो वॅलिड डॉक्युमेंट म्हणून मान्य करत नाहीत. अशावेळी उपयोगी ठरतो सरकारचा अधिकृत मोबाईल ऍप - mParivahan App.
या ऍपमध्ये जर तुम्ही तुमचं DL आणि RC सेव्ह करून ठेवलं, तर ट्रॅफिक पोलिस त्याला वैध डिजिटल डॉक्युमेंट म्हणून स्वीकारतात. म्हणजेच, चालान (दंड) होण्याची चिंता नाही.
advertisement
पण अनेकांना हे कसं करायचं? माहित नाही
चला तर पाहूया, mParivahan ऍपमध्ये तुमचं DL आणि RC कसं सेव्ह करायचं ते
mParivahan ऍपमध्ये अकाउंट कसं तयार कराल?
सर्वप्रथम Google Play Store किंवा App Store वरून mParivahan ऍप डाउनलोड करा.
ऍप उघडल्यानंतर Sign Up वर टॅप करा.
नोंदणी करताना तुमचा राज्य, मोबाईल नंबर, RC किंवा DL वरील तुमचं नाव, आणि mPin भरावं लागेल.
दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो टाकल्यानंतर तुमचं अकाउंट तयार होईल आणि तुम्ही Login करू शकाल.
RC (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) कसं जोडलं जातं?
ऍपमध्ये गेल्यावर My Virtual RC आणि My Virtual DL अशी दोन ऑप्शन्स दिसतील.
My Virtual RC वर टॅप करा.
तुमच्या गाडीचा नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर, आणि इंजिन नंबर टाका.
नंतर मोबाईलवर एक OTP येईल. तो वेरिफाय केल्यावर तुमचं RC ऍपमध्ये जोडलं जाईल.
जोडलेलं RC पाहताना तुम्हाला त्यावर एक QR कोड दिसेल, ज्याद्वारे ट्रॅफिक पोलिस RC ची वैधता तपासू शकतात.
DL (ड्रायव्हिंग लायसन्स) कसं जोडाल?
My Virtual DL वर टॅप करा.
तुमचा DL नंबर आणि जन्मतारीख भरा.
मोबाईलवर आलेला OTP वेरिफाय करा.
वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर तुमचं Virtual DL ऍपमध्ये सेव्ह होईल.
आता रस्त्यावर गाडी चालवताना तुम्हाला फिजिकल DL किंवा RC बाळगण्याची गरज नाही. फक्त mParivahan ऍप उघडा आणि दाखवा. पोलिसांनाही ते वैध मान्य आहे. डिजिटल युगात ही सुविधा केवळ सोयच नाही, तर कायद्याने मान्य असलेला सुरक्षित पर्याय आहे.