TRENDING:

cars : वर्ष संपणार आणि या गाड्या घेणार मार्केटचा निरोप, यात तुमची आवडती कार तर नाही ना?

Last Updated:

आता सरत्या वर्षासोबत काही कंपन्यांची कार मॉडेल्स निरोप घेणार आहेत. नवीन वर्षात तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असलात, तर सरत्या वर्षात बंद झालेल्या कार मॉडेल्सची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 28 डिसेंबर : काही दिवसांत 2023 हे वर्ष संपणार असून, आपण 2024 या नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत. सरतं वर्ष अनेक गोष्टींमुळे गाजलं. ऑटोमोटिव्ह क्षेत्राचा विचार करता, या क्षेत्रासाठी सरतं वर्ष खास ठरलं. काही कंपन्यांची कार मॉडेल्स चर्चेत राहिली. आता सरत्या वर्षासोबत काही कंपन्यांची कार मॉडेल्स निरोप घेणार आहेत. नवीन वर्षात तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असलात, तर सरत्या वर्षात बंद झालेल्या कार मॉडेल्सची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. कोणत्या कंपन्यांनी त्यांची जुनी कार मॉडेल्स बंद केली आहेत.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

2023 हे वर्ष ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी खास ठरलं. सरत्या वर्षात अनेक कंपन्यांनी नवीन कार मॉडेल्स लाँच केली, तर काही कार मॉडेल्सनी विक्रीचे नवीन उच्चांक प्रस्थापित केले; पण गेल्या काही वर्षांपासून मार्केटमध्ये मायलेज, फीचर्स, किंमत किंवा खास डिझाइनमुळे चर्चेत असलेल्या कार्स सरत्या वर्षासोबत निरोप घेणार आहेत.

क्विड 800 ही रेनॉल्ट कंपनीची लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग हॅचबॅक उत्सर्जनविषयक नवीन नियमांमुळे मार्केटचा निरोप घेणार आहे. या क्षेत्रातले उत्सर्जनासंदर्भातले नियम अधिक कडक झाल्याने मार्केटमधून हे मॉडेल काढून टाकण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे.

advertisement

प्रदूषणासंदर्भातले नवीन नियम पाहता स्कोडानं ऑक्टाव्हिया आणि सुपर्ब ही दोन मॉडेल्स भारतीय बाजारपेठेतून माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 2024 मध्ये नवीन मॉडेल्ससह पुनरागमन करण्याचे संकेतही दिले आहेत. भारतात लागू केलेल्या उत्सर्जनविषयक कठोर नियमांमुळे ह्युंदाईने प्रीमियम हॅचबॅक i20 आणि प्रीमियम सेडान व्हेर्नाचं डिझेल व्हॅरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टोयोटा किर्लोस्करच्या इनोव्हा क्रिस्टाला पेट्रोलवर चालणाऱ्या इनोव्हा हायक्रॉसने स्पर्धेतून बाहेर केलं आहे. हायक्रॉस पेट्रोल हायब्रिड आणि नॉन-हायब्रीड व्हॅरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसंच ती उत्सर्जनाच्या नियमांतही बसते.

advertisement

मारुती सुझुकीच्या सर्वांत यशस्वी कार मॉडेल्समध्ये समाविष्ट असलेली अल्टो ही कार गेल्या दोन दशकांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मारुती सुझुकीनं एप्रिल 2023मध्ये अल्टो 800 ला निरोप दिला आहे. नवीन सुरक्षा आणि उत्सर्जन नियमांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही कार बंद झाल्यानंतर तिची जागा भरून काढण्यासाठी मारुतीनं अल्टो के 10 नव्या रूपात लाँच केली आहे.

advertisement

होंडा कंपनीनं 2023 हे वर्ष सरताना त्यांच्या लाइनअपमधल्या काही कार्सची मॉडेल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात होंडा सिटी डिझेल, चौथ्या पिढीतली सिटी आणि अमेझ डिझेल या मॉडेल्सचा समावेश आहे. चौथ्या पिढीतल्या सिटीने पाचव्या पिढीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझ डिझेलला उत्सर्जनाच्या समस्यांचा सामना करावा लागला होता.

मराठी बातम्या/ऑटो/
cars : वर्ष संपणार आणि या गाड्या घेणार मार्केटचा निरोप, यात तुमची आवडती कार तर नाही ना?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल