Volkswagen Tiguan R-Line : जर्मन वाहन उत्पादक कंपनी Volkswagen ने आपल्या लोकप्रिय Tiguan R-Line वर दमदार अशी ऑफर आणली आहे. या एसयुव्हीवर ३ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. फोक्सवॅगनने अलीकडेच भारतात Volkswagen Tiguan R-Line लाँच केली होती. ही एक ५-सीटर एसयूव्ही आहे. जी थेट फॉर्च्युनरला टक्कर देते. या कारची किंमत ५८.५१ लाख (ऑन-रोड, मुंबई) इतकी आहे. पण, नोव्हेंबर २०२५ साठी, Volkswagen Tiguan R-Line वर ३ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली आहे. यामध्ये २ लाख रोख सवलत आणि ५०,००० चा लॉयल्टी बोनस किंवा कॉर्पोरेट लाभ आणि ५०,००० चा एक्सचेंज बोनस समावेश आहे. या एसयूव्हीमध्ये २.०-लिटर टीएसआय इंजिन (२०२ BHP आणि ३२० NM) आणि 7-स्पीड डीसीटी गिअरबॉक्स आहे.
advertisement
MG Gloster वर3.50 लाखांपर्यंत सूट
एमजी मोटर्सच्या MG Gloster ही एक ७-सीटर एसयूव्ही आहे. MG Gloster ही एक फॅमिलीसाठी बेस्ट अशी एसयूव्ही आहे. नोव्हेंबर २०२५ महिन्यात कंपनीने चांगली ऑफर दिली आहे. MG Gloster वर ३.५ लाखांची कॅश ऑफर दिली आहे. जर तुम्ही तुमची जुनी कार एक्सेंज करणार असाल तर तुम्हाला ५०,००० पर्यंत अतिरिक्त फायदा मिळू शकतो. सध्या, एसयूव्हीची किंमत ४६.६३ ते ५३.१३ लाख (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान आहे.
MG Gloster मध्ये ADAS सूट, ३६०-डिग्री कॅमेरा, पॉवर्ड फ्रंट सीट्स, मसाजिंग आणि व्हेंटिलेटेड ड्रायव्हर सीट, १२.३-इंच टचस्क्रीन आणि ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ असे फिचर्स दिले आहे. MG Gloster मध्ये २.०-लिटर टर्बो डिझेल इंजिन (१६१ बीएचपी आणि ३७५ एनएम) आणि २.०-लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन (२१५ BHP आणि ४८० NM).
Mahindra XUV400 वर 3.25 लाख रुपयांपर्यंत सूट
भारतीयांची फेव्हरेट असलेल्या Mahindra कंपनीने आपल्या XUV400 गाडीवर खास ऑफर दिली आहे.
जर तुम्ही २० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत एसयूव्ही शोधत असाल तर ही एक बेस्ट एसयूव्ही आहे. Mahindra XUV400 ही एक दमदार आणि पॉवरफुल अशी एसयूव्ही आहे. EL प्रो व्हेरिएंटवर ३.२५ लाख रुपयांच्या डिस्काउंट दिला आहे. तर इतर व्हेरिएंटवर १.२५ लाख रुपयांची सूट आहे. सध्या, या एसयूव्हीची किंमत १६.५९ लाख ते १८.८९ लाख (ऑन रोड, मुंबई) दरम्यान आहे.
Mahindra XUV400 मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय दिले आहे. एक ३४.५kWh बॅटरी आणि दुसरी ३९.४kWh बॅटरी. एका मोटरसह ३४.५kWh बॅटरी १४८bhp आणि ३७५ किमीची रेंज निर्माण करते. ३९.४kWh बॅटरी १४८bhp जनरेट करते परंतु तिचा टॉर्क ३१०Nm जास्त आहे. Mahindra XUV400 चीरेंज ४५६ किमी आहे.
