TRENDING:

Tataची कार खरेदीची शानदार संधी! Punch, Nexon, Curvv, Harrier, Altrozवर बंपर डिस्काउंट

Last Updated:

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या Punch, Nexon, Curvv, Altroz, Harrier आणि Safari वर हे डिस्काउंट ऑफर ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आहे. यामुळे तुम्ही तुमची आवडीच्या कारवर शानदार डिस्काउंटचा फायदा घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टाटा मोटर्सने जानेवारी 2026 मध्ये आपल्या निवडक इंजिनच्या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर केले आहे. ही ऑफर 1 जानेवारीपासून 31 जानेवारी 2026 पर्यंत राहील. ऑफरचा एकूण लाभ ग्राहकांना मिळणाऱ्या कंज्यूमर डिस्काउंट एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनस, लॉयल्टी बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट , SBI Yono डिस्काउंट, SSS ऑफर आणि अलायन्स ऑफरवर अवलंबून असेल.
ऑटो न्यूज
ऑटो न्यूज
advertisement

Tiago आणि Tigor

MY24 आणि MY25 चेसिससाठी एंट्री-लेव्हल टियागो आणि टिगोरच्या सर्व व्हेरिएंटवर (बेस टियागो XE प्रकार वगळता) एकूण ₹35,000 पर्यंत कन्ज्यूमर डिस्काउंट उपलब्ध आहे. दोन्ही कार MY25 मॉडेलसाठी रिफ्रेश केलेल्या बाह्य आणि अंतर्गत सजावटीसह अपडेट केल्या आहेत.

बाईक धुताना लोक करतात हा सामान्य चुका! इंजिनसह बॉडीलाही होऊ शकतं नुकसान

advertisement

Altroz

सर्व प्री-फेसलिफ्ट अल्ट्रोज व्हेरिएंट्सवर (पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी) ग्राहकांसाठी डिस्काउंट ₹60,000 आहे. त्यासोबत ₹25,000 एक्सचेंज/स्क्रॅप ऑफर आहे. यामुळे एकूण डिस्काउंट ₹85,000 पर्यंत पोहोचते. एसबीआय योनो, टाटा एसएसएस रेफरल्स, कॉर्पोरेट बुकिंग आणि इतर ऑफरसह अतिरिक्त बचत करता येते. फेसलिफ्ट अल्ट्रोज व्हेरिएंटवर कमाल डिस्काउंट ₹25,000 पर्यंत आहे.

Punch आणि Nexon

Punch SUV च्या सर्व व्हेरिएंट्स (MY24 आणि MY25) वर पेट्रोल  आणि सीएनची पर्यायांसाठी एकूण डिस्काउंट ₹40,000 पर्यंत आहे. ज्यामध्ये ₹20,000 चा लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. Nexon सर्व-4 मीटर SUV च्या सर्व व्हेरिएंट्सवर ₹50,000 चा डिस्काउंट आहे. ज्यामध्ये ₹20,000 चं लॉयल्टी बोनस समाविष्ट आहे. Curvv वर लॉयल्टी बोनस मिळत नाही. याचं जास्तीत जास्त डिस्काउंट ₹40,000 पर्यंत आहे.

advertisement

Electric Car चार्ज करताना कधीच करु नका या चुका! अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Harrier आणि Safari

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतात करा गार AC मध्ये काम, चक्क ट्रॅक्टरला बसवला एसी, किती आला खर्च? Video
सर्व पहा

टाटा मोर्टर्सची प्रमुख एसयूव्ही हॅरियर आणि सफारीला नुकतेच नवीन हायपरियन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंडिनसह तयार करण्यात आले आहे. जानेवारी 2025 साठी, हॅरियर आणि सफारी डिझेलच्या सर्व नवीन व्हेरिएंट (X आणि X+ अपडेटनंतर) जास्तीत जास्त 75,000 रुपयांची एकसमान सूट दिली जात आहे. ज्यामध्ये 25,000 रुपयांची ग्राहक सवलती आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज/स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे. तुम्ही या कारवर कॉर्पोरेट डिस्काउंट,SBI Yono डिस्काउंट, Tata SSS ऑफर्स आणि अलायन्स ऑफर्स  (जसे Indian Dental Association, Deloitte आणि Aditya Birla Group) चा फायदा घेऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Tataची कार खरेदीची शानदार संधी! Punch, Nexon, Curvv, Harrier, Altrozवर बंपर डिस्काउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल