TRENDING:

Hyundai आणि Honda च्या SUV विसरा, Tata Sierra चे फिचर्स पाहून तुम्ही लगेच कराल SUV बूक!

Last Updated:

“द लेजंड इज रिटर्न्स” असं म्हणत Tata Motors ने Sierra 2025 अखेर लाँच केली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एसयूव्ही गाड्यांचा सध्या देशभरात ट्रेंड सुरू असताना, सेफ्टी आणि दमदार परफॉर्मन्स म्हटलं की सर्वात आधी टाटाचं नाव घेतलं जातं. 1991 साली भारतीय बाजारात पहिली एसयूव्ही म्हणून दाखल झालेली टाटा सियारा आता पुन्हा एकदा नव्या स्टाईलमध्ये आणि आधुनिक तडका घेऊन परतली आहे. “द लेजंड इज रिटर्न्स” असं म्हणत Tata Motors ने Sierra 2025 अखेर लाँच केली आहे.
advertisement

25 नोव्हेंबर 2025 रोजी tata sierra ही आयकॉनिक एसयूव्ही अधिकृतरीत्या लाँच झाली असून तिची किंमत आणि फीचर्स पाहून मध्यमवर्गीय ग्राहकांनाही ही गाडी सहज परवडेल असं स्पष्ट दिसतं. इतकंच नाही तर फीचर्स पाहिल्यावर क्रेटा, ग्रँड व्हिटारा अशा लोकप्रिय एसयूव्हीलाही मागे टाकत Sierra पुन्हा एकदा मार्केटची ‘फेव्हरेट’ होईल, अशी चर्चा सुरू आहे.  tata sierra मध्ये Smart+, Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ असे एकूण 7 व्हेरिएंट्स दिले आहे. 34 वर्षांपूर्वीच्या क्लासिक सियाराशी जोडलेला नॉस्टॅल्जिक लूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ही नव्या Sierra ची खासीयत ठरते.

advertisement

दमदार इंजिनचे तीन पर्याय

Tata Sierra 2025 मध्ये एकूण तीन इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहेत. 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो पेट्रोल (ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टर)1.5-लीटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल (मॅन्युअल + DCA ड्युअल क्लच ऑटोमॅटिक)1.5-लीटर क्रायोजेट डिझेल (लाँच बाकी)

डिझाईन कसं?

tata sierra च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर, क्लासिक + मॉडर्न डिझाईननवीन Sierra हे ARGOS आर्किटेक्चरवर आधारित असून थ्री-क्वार्टर ग्लास कन्सेप्ट, फ्लश ग्लास पॅनल आणि क्लॅमशेल-स्टाइल टेलगेट यामुळे गाडीचा लूक प्रीमियम आणि हटके दिसतो. यामध्ये फुल LED लायटिंगसेबर-स्टाईल LED DRLरूंद LED बार19-इंच अलॉय व्हील्सफ्लश डोर हँडल्सयांचा समावेश आहे. तसंच, या एसयूव्हीमध्येसर्वात मोठा सनरूफ आणि ADAS लेव्हल 2+सेफ्टी फिचर्स दिले आहे.

advertisement

सेफ्टीमध्ये काय काय आहे एसयूव्हीत?

tata sierra मध्ये  6 एअरबॅग्स (स्टँडर्ड)इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकADAS Level 2+ (22 फंक्शन्स) दिले आहे. तसंच tata sierra मध्ये  थिएटर प्रो तीन स्क्रीन, डॉल्बी अटमॉस साउंड दिले आहे.

Tata Sierra 2025 मध्ये दिलेले कम्फर्ट फीचर्स या सेगमेंटमध्ये खरोखरच प्रीमियम अनुभव देतात. गाडीत व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ड्रायव्हरसाठी मेमरी फंक्शनसह पॉवर-अॅडजस्टेबल सीट, वायरलेस चार्जिंग, ड्युअल-झोन पूर्ण ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण (FATC) आणि कूल्ड ग्लोव्ह बॉक्स देण्यात आले आहे. केबिनची जागा प्रशस्त असून सॉफ्ट-टच मटेरियल आणि अॅम्बियंट लाइटिंगमुळे इंटीरियर अधिक क्लासी जाणवतं. तसेच अॅडजस्टेबल थाय सपोर्ट आणि JBL च्या 12-स्पीकर डॉल्बी अटमॉस सिस्टममुळे लांब प्रवासातही आरामदायी आणि मनोरंजक ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.

advertisement

मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी SUV

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

टाटा मोटर्सने Sierra 2025 ची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत ₹11.49 लाख (मुंबई) ठेवली आहे, जी तिच्या फीचर्सनुसार मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी आकर्षक ठरते. या गाडीची बुकिंग 16 डिसेंबर 2025 पासून सुरू होईल. ग्राहकांना जास्त प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून डिलिव्हरीची तारीखही जाहीर करण्यात आली आहे आणि Sierra 2025 ची अधिकृत डिलिव्हरीज 15 जानेवारी 2026 पासून सुरु होणार आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai आणि Honda च्या SUV विसरा, Tata Sierra चे फिचर्स पाहून तुम्ही लगेच कराल SUV बूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल