मक्याची आवक
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 30 हजार, 743 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 11 हजार 988 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1013 ते जास्तीत जास्त 1801 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 739 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
प्रेरणादायी! शारीरिक दिव्यांगत्वाला बनवली ताकद, दिव्यांग क्रिकेटपटू साजीद तांबोळीची टीम इंडियात निवड
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 38 हजार 791 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 65 हजार 736 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 295 ते 1463 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2290 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीनची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 88 हजार 667 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 27 हजार, 804 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3913 ते 4647 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 हजार 326 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4050 ते 5023 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





