advertisement

Krushi Market: सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
Krushi

Krushi Market

मुंबई : मंगळवार, दिनांक 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा आणि मका आवक आणि भाव पाहू.
मक्याची आवक 
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 30 हजार, 743 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 11 हजार 988 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1013 ते जास्तीत जास्त 1801 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 739 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 38 हजार 791 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 65 हजार 736 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 295 ते 1463 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2290 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये 88 हजार 667 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 27 हजार, 804 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3913 ते 4647 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 हजार 326 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4050 ते 5023 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market: सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
Next Article
advertisement
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; दोन सरकारी बँका गायब होऊन एकच महाBank होणार
बँकिंग क्षेत्रात भूकंप, बजेटच्या काही तास आधी आली मोठी बातमी; 2 बँका गायब होणार
  • बँकिंग जगतात मोठी उलथापालथ

  • सरकारी बँकिंगमध्ये मोठा ‘मर्जर शॉक’

  • ग्राहकांवर काय होणार परिणाम?

View All
advertisement