TRENDING:

Tata sierra मार्केटमध्ये 3 अशा SUV ना थेट भिडणार, किंमत कुणाची कमी?

Last Updated:

टाटा सियाराची किंमत ही सुरुवातीची ऑफर किंमतही ११.४९ लाख रुपये ठेवली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आधीपासून असलेल्या अनेक गाड्यांना Tata Sierra थेट टक्कर देणार आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
टाटा मोटर्सने अखेर बऱ्याच दिवसांपासून ज्या एसयूव्हीची चर्चा होती, तिच्यावरून अखेरीस पडदा बाजूला केला आहे. टाटा मोटर्सने आपली Tata Sierra अखेर लाँच केली आहे. टाटा सियाराची किंमत ही सुरुवातीची ऑफर किंमतही ११.४९ लाख रुपये ठेवली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आधीपासून असलेल्या अनेक गाड्यांना Tata Sierra थेट टक्कर देणार आहे.
News18
News18
advertisement

टाटा मोटर्सने तब्बल २० वर्षानंतर एका सियाराला नव्या रुपात आणि नव्या रंगात लाँच केली आहे. ही एक मिड साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे मिड साईज एसयूव्ही सेगममेंटमध्ये टाटा सियारामुळे भूकंप आला आहे. विशेष म्हणजे, या सेगमेंटमध्ये एसयूव्हीची विक्री चांगली आहे. त्यामुळे टाटा मोटर्स आता हुंदाई क्रेटापासून ते अने गाड्यांना टक्कर देणार आहे.

advertisement

Hyundai Creta : एसयूव्हीच्या मिड सेगमेंटमध्ये टाटा सियाराचा पहिला सामना होणार आहे तो थेट Hyundai Creta शी. कारण, मागील अनेक वर्षांपासून Hyundai Creta ने मार्केटवर कब्जा करून ठेवला आहे. दमदार फिचर्स, पॉवरफुल इंजिनसह अनेक मॉडेल आणि चांगली रिसेल व्हॅल्यू त्यामुळे Creta ने आपली जागा काबीज केली आहे. पण, Hyundai Creta मध्ये काही गोष्टी नाही. पण पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट आणि हायटेक कनेक्टेड कार टेक्नोलॉजी दिली आहे. Hyundai Creta किंमत ही १०.७२ लाखांपासून सुरू होते.

advertisement

 Kia Seltos - कोरियन कंपनी असलेल्या हुंदईची कॉपी किया मोटर्सची Kia Seltos ही सियाराला टक्कर देण्यासाठी भारतातील दुसरी एसयूव्ही आहे.  Seltos ने आपलया स्पोर्टी लूक, प्रीमियम इंटीरिअर आणि चांगल्या परफॉर्मेंसमुळे चांगलीच फेमस आहे. या रेंजच्या सेगमेंटमध्ये सगळ्यात आधी Level-2 ADAS, पॉवरफुलटर्बो इंजिन पर्याय आणि शानदार इंटिरिअर डिझाईन दिलं आहे.  Kia Seltos किंमतही १०.७९ लाखांपासून ते १९ लाखांपर्यंत आहे.

advertisement

Honda Elevate - तिसऱ्या नंबरवर येते जपानी वाहन उत्पादक कंपनी होंडाची Honda Elevate. या सेगमेंटमध्ये ही एक धाकड अशी एसयूव्ही आहे. ती एक दमदार क्वालिटी आणि शानदार फिचर्ससह येते. ही एक प्रीमियम एसयूव्ही आहे. Honda Elevateमध्ये  स्पेशियस केबिन स्पेस आणि दमदार असे  ड्रायविंग डायनामिक्स फिचर्स दिले आहे. जे ड्रायव्हरला एक वेगळाच अनुभव देते.  Honda Elevate मध्ये चांगला बूट स्पेस दिला आहे,  आरामदायक सस्पेंशन सेटअप आणि होंडा सेंसिंग टेक्नोलॉजी (ADAS) सुद्धा आहे.  Honda Elevate ची किंमत ११.९६ लाखांपासून सुरू होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा उलटफेर, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

Tata Harrier - आता याच सेगमेंटमध्ये टाटा सियारा आपल्या कंपनीच्या टाटा हॅरियरलाही टक्कर देत आहे. Tata Harrier ही एक धाकड आणि  प्रीमियम, दणकट अशी एसयूव्ही आहे. ज्यामुळे सियाराच्या अडचणी वाढवू शकते. कारण, Tata Harrier मध्ये दमदार व्हेरियंट दिले आहे, जे  दमदार रोड प्रेजेंस, ओमेगा आर्किटेक्चरवर एक मजबूत आणि दमदार क्रायोटेक डिझेल इंजिन सुद्धा दिलं आहे. Tata Harrier ची किंमत १५.४९ लाखांपासून सुरू होते.

मराठी बातम्या/ऑटो/
Tata sierra मार्केटमध्ये 3 अशा SUV ना थेट भिडणार, किंमत कुणाची कमी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल