टाटा मोटर्सने अलीकडे ICE व्हेरियंट्ससह इलेक्ट्रिक मॉडल लाँच केले आहे. यामध्ये tata curvv चा समावेश आहे. आता टाटा मोटर्स ICE व्हेरिएंट्सवर tata sierra लाँच करणार आहे. tata sierra चं इलेक्ट्रिक व्हर्जन पुढील वर्षी 2026 मध्ये जानेवारी महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने tata sierra चं EV मॉडेल लाँच होणार आहे.
advertisement
Tata Sierra ही १९६१ मध्ये लाँच झाली होती. तेव्हा देशात तयार होणारी ही पहिली SUV ठरली होती. आता ३४ वर्षांनंतर टाटाने नव्या रुपात आणि नव्या रंगात Tata Sierra लाँच केली आहे. टाटा मोटर्सने Tata Sierra ही सगळ्या प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे EV सेगमेंटमध्येही लवकरच लाँच होणार आहे. .
कितनी असेल Tata Sierra EV ची किंमत?
Tata Sierra ची सध्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये ११.४९ लाखांपासून ते २० लाखांपर्यंत किंमत ठेवण्यात आली आहे. हटके डिझाईन आणि दमदार असा लूक असल्यामुळे Tata Sierra ही वेगळी ठरली आहे. आता Tata Sierra EV मॉडेल हे 20 लाख रुपयांपासून ते 30 लाखांच्या रेंजमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
किती असेल रेंज?
टाटा मोटर्सची Tata Sierra ही इलेक्ट्रिक कार acti.ev प्लॅटफॉर्मवर बेस असणार आहे. जी रियर व्हिल ड्राइव्ह आणि ऑल व्हिल ड्रॉइव्ह या दोन्ही प्रकारात येणार आहे. Tata Sierra मध्ये दोन बॅटरीचे पॅक असणार आहे. त्यामुळे कार एकदा फुल चार्ज केल्यावर 450 ते 550 किलोमीटर इतकी रेंज मिळेल.
Tata Sierra च्या EV मॉडेलमध्ये डुअल डिस्प्ले इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशन आणि एक 360-डिग्री HD कॅमेरा असणार आहे. Tata Sierra EV मध्ये सेफ्टीसाठी ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फिचर्स मिळणार आहे. Tata Sierra EV मध्ये ADAS 2 फिचर्सही मिळणार आहे.
