TRENDING:

Car and Bike Insurance : थर्ड पार्टी की कॉम्प्रिहेन्सिव्ह, गाडीसाठी कोणतं इन्शुरन्स बेस्ट? निवडताना 'या' चुका टाळा

Last Updated:

अनेक वाहनमालक पॉलिसी घेण्यापूर्वी त्यातील फरक, फायदे-तोटे नीट समजून घेत नाहीत आणि नंतर नुकसान झाल्यावर मोठा खर्च स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. त्यामुळे कार इन्शुरन्सबद्दलची मूलभूत माहिती जाणून घेणं अत्यावश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गाडी घेणं हा अनेकांचा मोठा स्वप्नांचा क्षण असतो. पण गाडीच्या किमतीइतक्याच महत्त्वाचा निर्णय म्हणजे तिच्या इन्शुरन्सची योग्य निवड. अनेक वाहनमालक पॉलिसी घेण्यापूर्वी त्यातील फरक, फायदे-तोटे नीट समजून घेत नाहीत आणि नंतर नुकसान झाल्यावर मोठा खर्च स्वतःच्या खिशातून भरावा लागतो. त्यामुळे कार इन्शुरन्सबद्दलची मूलभूत माहिती जाणून घेणं अत्यावश्यक आहे.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

भारतातील Motor Vehicle Act 1988 नुसार, प्रत्येक कार मालकाला किमान थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं बंधनकारक आहे. या पॉलिसीशिवाय गाडी रस्त्यावर चालवली तर मोठा दंड आकारला जाऊ शकतो. वाहन पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येऊ शकतं आणि अपघात झाल्यास समोरील पक्षाचे नुकसान स्वतः भरावे लागते

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या गर्दीच्या रस्त्यांवर रोजच्या ट्रॅफिकमध्ये छोट्या-मोठ्या घटना घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इन्शुरन्सची योग्य निवड फार महत्त्वाची ठरते.

advertisement

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय?

थर्ड पार्टी इन्शुरन्स हा फक्त कायदेशीर गरज पूर्ण करण्यासाठी घेतला जाणारा पॉलिसी प्रकार आहे. यामध्ये कव्हर मिळत, समोरील पार्टिच्या मालमत्तेचं नुकसान भरलं जातं, समोरील पार्टिच्या वाहनाचं नुकसान भरुन दिलं जातं. अपघातात इतरांना झालेली दुखापत किंवा मृत्यूची भरपाई भरुन मिळते.

मग यामध्ये काय कव्हर होत नाही:

advertisement

तुमच्या स्वतःच्या कारचं नुकसान, चोरी, नैसर्गिक आपत्ती, आग, पुर यामुळे झालेलं नुकसान. म्हणूनच हा पॉलिसी प्रकार स्वस्त असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने मर्यादित आहे.

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स काय आहे?

कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीत थर्ड पार्टी कव्हरसोबत स्वतःच्या वाहनाचं नुकसानही कव्हर केलं जातं. या पॉलिसीमध्ये तुम्हाला मिळतं तुमच्या कारचं अपघातात झालेलं नुकसान, चोरी झाल्यास संपूर्ण भरपाई, पुर, वादळ, पावसाळ्यातील पाण्यामुळे झालेलं नुकसान, आग लागल्यास भरपाई, रोडसाइड असिस्टन्स, पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर

advertisement

हा पॉलिसी प्रिमियम महाग असतो, पण नुकसानाच्या वेळी हा सर्वांत जास्त उपयोग होणारा पर्याय मानला जातो.

महाराष्ट्रात कार इन्शुरन्स घेताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका

1. फक्त थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणे

ट्रॅफिक असणाऱ्या शहरांमध्ये लहान अपघातांमध्येही मोठा खर्च येतो. थर्ड पार्टी पॉलिसी असल्यास स्वतःच्या गाडीचं नुकसान तुम्हालाच भरावं लागतं.

2. IDV कमी ठेवणे

advertisement

IDV (Insured Declared Value) कमी ठेवल्यास प्रिमियम कमी येतो, पण गाडी चोरी गेली किंवा टोटल लॉस झाल्यास कमी भरपाई मिळते.

3. ऍड-ऑन कव्हर्स न घेणे

झिरो डेप्रिशिएशन इंजिन प्रोटेक्शन (पावसाळ्यात अत्यावश्यक)

4. पॉलिसी न वाचता एजंटवर अवलंबून राहणे

काही वेळा एजंट आपल्या सोयीची पॉलिसी देतात. त्यामुळे अटी, कव्हर आणि एक्सक्लूजन स्वतः तपासणं महत्त्वाचं.

5. रिन्यू वेळेत न करणे

पॉलिसी लॅप्स झाल्यास इंस्पेक्शन आणि जास्त प्रिमियम लागू शकतो.

कुठला इन्शुरन्स कोणासाठी?

नवीन किंवा 1–5 वर्षे जुन्या गाड्यांसाठी: कॉम्प्रिहेन्सिव्ह + झिरो डेप्रिशिएशन

6–10 वर्षे जुन्या गाड्यांसाठी:

कॉम्प्रिहेन्सिव्ह + इंजिन प्रोटेक्शन + NCB प्रोटेक्टर

कमी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी:

बेसिक कॉम्प्रिहेन्सिव्ह

किमान कायदेशीर आवश्यकता:

थर्ड पार्टी (पर्याय आहे, पण आर्थिकदृष्ट्या धोकादायक)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर पुन्हा घसरले, कांदा आणि मक्याची आज काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

इन्शुरन्स म्हणजे फक्त कागदपत्र नव्हे, तर तुमच्याकडे असणारी सर्वांत महत्त्वाची आर्थिक कवच आहे. महाराष्ट्रातील वाढता ट्रॅफिक, अनिश्चित हवामान, पावसाळ्यातील पूरस्थिती आणि वाहनचोरीचे प्रकार पाहता, फक्त थर्ड पार्टी नव्हे तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेणं अधिक सुरक्षित आणि योग्य ठरते. योग्य पॉलिसी निवडा, तुमची कार सुरक्षित ठेवा आणि अनपेक्षित खर्च टाळा.

मराठी बातम्या/ऑटो/
Car and Bike Insurance : थर्ड पार्टी की कॉम्प्रिहेन्सिव्ह, गाडीसाठी कोणतं इन्शुरन्स बेस्ट? निवडताना 'या' चुका टाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल