महिंद्रा XEV 9e
महिंद्राची EV कार XEV 9e सुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या BNCAP क्रॅश टेस्टमध्ये महिंद्रा EV ने 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या कारने 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक उत्तम आणि सुरक्षित कार शोधत असाल, तर ही कार तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या कारची (एक्स-शोरूम) किंमत 21.90 लाख ते 30.50 लाख रुपयांपर्यंत आहे.
advertisement
कारचं इंजिन दीर्घकाळ टकाटक ठेवायचंय? मग फॉलो करा या 4 टिप्स
महिंद्रा BE 6
महिंद्रा कंपनीच्या BE 6 या कारनेही बीएनसीएपी क्रॅश-टेस्टमध्ये झेंडा फडकवला आहे. या कारला बीएनसीएपीने 5 स्टार रेटिंग देखील दिले आहे. कंपनीने या कारमध्ये 7 एअरबॅग्ज, लेव्हल 2 ADAS सारखी फीचर्स जोडली आहेत. ज्यामुळे कारमधील प्रवासी खूप सुरक्षित राहतात. लोकांना ही कार खूप आवडत आहे. महिंद्रा BE 6 ची (एक्स-शोरूम) किंमत 18.90 लाख रुपयांपासून 26.90 लाख रुपयांपर्यंत आहे.
Tata Punch Ev
तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही टाटा पंच इव्ह कार खरेदी करू शकता. बीएनसीएपी क्रॅश-टेस्टमध्ये टाटा पंच इव्ह कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि हिल क्लाइंब असिस्ट सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ही कार घरी आणण्यासाठी तुम्हाला 9.99 लाख रुपये ते 14.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) खर्च करावे लागतील.
आता Car आणा दारात! अशा गाड्यांची किंमती होणार कमी, केंद्र सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम
Skoda Kylaq
स्कोडा किलकने BNCAP क्रॅश-टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देखील मिळवले आहे. या कारमध्ये ईबीडी, पडदा एअरबॅग्ज, एबीएस सारखी फीचर्स देण्यात आली आहेत. मुलांच्या सुरक्षेत स्कोडा किलकला 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. या कारची किंमत (एक्स-शोरूम) 8.25 लाख रुपये ते 13.99 लाख रुपये आहे.
