आता Car आणा दारात! अशा गाड्यांची किंमती होणार कमी, केंद्र सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम
- Published by:Sachin S
Last Updated:
आपल्या दारातही एखादी कार उभी असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो, पण कारच्या वाढीव किंमत आणि सरकारच्या कर धोरणामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियांचं कारचं स्वप्न हे स्वप्नचं राहून जातंय.
आपल्या दारातही एखादी कार उभी असावी असं प्रत्येक जण स्वप्न पाहत असतो, पण कारच्या वाढीव किंमत आणि सरकारच्या कर धोरणामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियांचं कारचं स्वप्न हे स्वप्नचं राहून जातंय. पण आता 2027 मध्ये केंद्र सरकारने GST च्या दरात मोठे बदल केले आहे. त्याामुळे ऑटो सेक्टरमध्ये ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण, केंद्र सरकारने छोट्या पेट्रोल आणि डिझेल कारवर GST जो 28% टक्के होता तो आता 18% टक्के करणार आहे. तसंच हेल्थ आणि लाइफ विमा प्रीमियमवर GST हा 5% करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे जर ऑक्टोबरमध्ये GST परिषदेनं मंजुरी दिली तर नवीन टॅक्स स्ट्रक्चर लागू होईल.
छोट्या कारचे दर होतील कमी
GST मध्ये कर रचनेत बदल झाला तर 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या गाड्या ज्या 1200cc पेट्रोल आणि 1500cc डिझेल इंजिन असलेल्या गाड्या असतील. या सेगमेंटमध्ये विक्री कमी होत चालली आहे. कारण, ग्राहकांना आता मोठ्या गाड्या आणि दमदार SUV घेण्याकडे कल वाढला आहे. अलीकडे कारच्या किंमती एसयूव्ही उपलब्ध उपलब्ध आहे. नवीन GST दरात छोट्या कारच्या किंमतीवर परिणाम होतील. त्यामुळे छोट्या कारचे दर हे कमी होतील. मारुती सुझुकी, हुंदई सारख्या कार उत्पादक छोट्या कार उत्पादक अग्रेसर आहे.
advertisement
मोठ्या कारचं काय होईल?
केंद्र सरकारने GST कर रचनेत बदल केला तर मोठ्या गाड्यांच्या किंमती वाढतील का अशी शक्यता निर्माण झाली आहे. पण ज्या गाड्यांचं मोठं इंजिन आहे त्या गााड्यांवर जवळपास 50 टक्के म्हणजेच, 28 टक्के GST आणि 22 टक्के सेस ) कर आकारला जाऊ शकतो. ज्याची मर्याद ही 40 टक्क्यांपर्यंत आणली जाऊ शकते. या व्यतिरिक्त लेवी लावली जाईल, ज्यामुळे टोटल टॅक्स 43-50 टक्के राहिल.
advertisement
विमा होईल स्वस्त
view commentsहेल्थ आणि लाइफ इन्श्योरन्स प्रीमियमवर GST 18% वरून 5% टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. २-स्लॅब GST स्ट्रक्चरमध्ये बदल कऱण्याचा सरकारचा विचार आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून चार-स्लॅब प्रणाली (5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के) रद्द करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे फक्त 5 टक्के आणि 18 टक्के कर प्रणाली तयार करणार आहे. 28 टक्के स्लॅब आता रद्द करण्याचा सरकारचा विचार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 7:16 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
आता Car आणा दारात! अशा गाड्यांची किंमती होणार कमी, केंद्र सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम


