TRENDING:

GST कटनंतर Toyota Fortuner चं कोणतं व्हेरिएंट मिळेल सर्वात स्वस्त? एकदा करा चेक

Last Updated:

Toyota Fortuner Price Reduction: जीएसटी कपातीनंतर, टोयोटा फॉर्च्युनरसारखे लोकप्रिय मॉडेल खरेदी करणे सोपे झाले आहे. कोणता व्हेरिएंट खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल ते पाहूया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : केंद्र सरकारने सणासुदीच्या हंगामापूर्वी लोकांना जीएसटी कपातीची मोठी भेट दिली आहे. नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून संपूर्ण भारतात लागू होतील. अशा परिस्थितीत, सर्व कार उत्पादक कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत. टोयोटा मोटर्स देखील त्यांच्या ग्राहकांना जीएसटी कपातीचा पूर्ण फायदा देण्यास तयार आहे.
टोयोटा फॉर्च्यूनर
टोयोटा फॉर्च्यूनर
advertisement

जीएसटी कपातीनंतर, टोयोटा फॉर्च्युनरसारखे लोकप्रिय मॉडेल खरेदी करणे सोपे झाले आहे. खरं तर, टोयोटा फॉर्च्युनरच्या किंमतीत 3.49 लाख रुपयांची कपात करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्युनरच्या कोणत्या व्हेरिएंटवर किती सूट मिळणार आहे ते पाहूया. पूर्वी फॉर्च्युनरवर 50% (28% जीएसटी + 22% सेस) कर आकारला जात होता. जो आता जीएसटी कपातीनंतर 40% एकसमान करण्यात आला आहे.

advertisement

Sunroof कार खरेदीचा प्लॅन आहे? मग आधी जाणून घ्या या गोष्टी, होईल फायदा

कोणत्या व्हेरिएंटवर सर्वाधिक सूट मिळत आहे?

टोयोटा फॉर्च्युनरच्या 4X2 MT Petrol व्हेरिएंटची किंमत आधी 36.05 लाख रुपये होती, जी आता 33.65 हजार रुपये करण्यात आली आहे. अशाप्रकारे, या व्हेरिएंटवर एकूण 2.40 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. फॉर्च्युनरच्या जीआरएस व्हेरिएंटवर सर्वाधिक सूट दिली जात आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 52.34 लाख रुपये आहे, जी 48.85 लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच, या मॉडेलवर तुम्हाला 3.49 लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे.

advertisement

GST 2.0: आता छोटी कार कशाला घेता, थेट SUV घ्या! Maruti ची SUV तब्बल 1.11 लाखांने स्वस्त

टोयोटा मोटर्स काय म्हणतात?

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विरिंदर वाधवा म्हणाले, "हे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल आम्ही भारत सरकारचे आभार मानतो. जीएसटी 2.0 मुळे ग्राहकांना कार खरेदी करणे सोपे होईल आणि ऑटो उद्योगावरील विश्वासही मजबूत होईल. या बदलामुळे सणासुदीच्या काळात मागणी आणखी वाढेल. टोयोटा नेहमीच पारदर्शक आणि ग्राहक-प्रथम धोरणावर काम करते आणि म्हणूनच जीएसटी कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
GST कटनंतर Toyota Fortuner चं कोणतं व्हेरिएंट मिळेल सर्वात स्वस्त? एकदा करा चेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल