2019 पूर्वीच्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट अत्यावश्यक आहे. ज्यांनी अजूनही ती घेतली नाही किंवा रजिस्ट्रेशन केलं पण अद्याप आली नाही त्यांनी तातडीनं ती बाईक आणि कारला बसवून घेणं आवश्यक आहे. 58 लाख गाड्यांची नंबरप्लेट बसवण्याचे काम पूर्ण झालं आहे. मात्र अजूनही अशा काही गाड्या आहेत ज्यांच्या नंबर प्लेट बसवण्याचे काम अजूनही बाकी आहे. 40 लाख गाड्यांना अजूनही ही प्लेट बसवणं बाकी आहे.
advertisement
HSRP Number Plate होणार बंधनकारक, पण यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
18 लाख वाहन धारकांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलं मात्र अजून नंबर प्लेट बसवली नाही. ती प्रोसेसमध्ये आहे. अर्ज करुनही नंबर प्लेट मिळत नाहीत अशा तक्रारी वाहन धारकांच्या आहेत. या सगळ्यांना आता फक्त 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या नंतर कोणतीही मुदतवाढ होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. वाहन चालकांमध्ये याबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे.
हाय-सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) ही एक व्हीकल लायसेन्स प्लेट आहे. जी छेडछाड-प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे. HSRP प्लेट्समध्ये एक यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर, होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमसारख्या टिकाऊ मटेरियलपासून बनलेली आहे आणि त्यावर हॉट-स्टॅम्प केलेला अल्फा-न्यूमेरिक कोड आहे.
transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करु शकता. यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्टही सिलेक्ट करावी लागेल.यानंतर तुम्हाला मिळालेल्या तारखेला तुम्हाला फिटमेंट सेंटरला जावं लागेल. तिथे गेल्यानंतर वेंडर तुमच्या वाहनाला नंबर प्लेट बसवून त्यांची नोंद वाहन सिस्टममध्ये करेल.त्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नंबर प्लेट बसवणार तेव्हा ती कुठेही बसवू नका. ही नंबर प्लेट अधिकृत वेंडरकडूनच बसवून घ्यावी.