TRENDING:

EV गाड्या आणखी स्वस्त होणार का, बजेटमधून मिळेल दिलासा? 5 मोठी कारणं

Last Updated:

सरकारला ईव्ही क्षेत्राताल आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि ते शाश्वत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गेल्या एक-दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही) अर्थात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात भारताची मोठी प्रगती होत असताना दिसत आहे. या क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. देशात हरित ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ईव्ही उद्योगाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे आगामी बजेटकडून ईव्ही क्षेत्राच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रातल्या कंपन्यांनी सरकारकडे आपल्या मागण्या आणि सूचना ठेवल्या आहेत.
(अर्थमंत्री निर्मला सीतारमण)
(अर्थमंत्री निर्मला सीतारमण)
advertisement

सरकारला ईव्ही क्षेत्राताल आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि ते शाश्वत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. ईव्ही कंपन्यांनी संशोधन-विकासात गुंतवणूक, सबसिडीत वाढ, ईव्ही उत्पादन प्लांट्ससाठी इन्सेन्टिव्ह देण्याची मागणी केली आहे. तसंच, जीएसटी संरचना सुलभ बनवण्याची आणि ईव्ही लोनवर टॅक्स बेनिफिट्स देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

बॅटरी उत्पादन हा ईव्ही क्षेत्रातला महत्त्वाचा भाग आहे. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी PLI योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे. मॅक्सव्होल्ट एनर्जीसारख्या कंपन्यांना असं वाटतं, की बॅटरी उत्पादन आणि संशोधन-विकास यांसाठी अतिरिक्त निधी आणि करसवलत मिळायला हवी.

advertisement

क्रेडिफिन लिमिटेडचे सीईओ शल्य गुप्ता यांचं म्हणणं आहे, की सरकार ग्रीन बाँड जारी करू शकतं. त्याचा उपयोग ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी केला जाईल. त्यासोबतच दीर्घकालीन सबसिडीमुळे ईव्ही उत्पादनाला नवा वेग प्राप्त होऊ शकतो.

FAME-II स्कीमअंतर्गत ईव्ही खरेदी केल्यानंतर सबसिडी मिळते. बजेटमध्ये या योजनेची व्याप्ती वाढवली जाण्याची आणि नवी उद्दिष्टं निश्चित केली जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रायव्हेट आणि कमर्शियल ईव्हीच्या विक्रीला प्रोत्साहन मिळेल.

advertisement

(Electric कारचं खरं सत्य, पेट्रोल-डिझेलच्या वाहनांपेक्षा करतात जास्त प्रदूषण? हे आहे कारण)

ईव्ही कंपन्यांची प्रमुख मागणी अशी आहे, की ईव्ही बॅटरीवर सध्या असलेला 18 टक्के जीएसटी दर घटवून 5 टक्के केला जावा. त्यामुळे ईव्हीचा खर्च कमी होईल आणि ग्राहकांना अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध होतील. ईव्हीसाठीच्या कर्जाचे व्याजदरही घटवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे ईव्ही खरेदी करणाऱ्यांना अर्थसाह्य मिळू शकेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

भारतात ईव्हीचा वापर व्यापक पातळीवर वाढायला हवा असेल, तर चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम असण्याची गरज आहे. सरकारने या दिशेने पावलं उचलावीत अशी विनंती ओबेन इलेक्ट्रिक आणि अन्य कंपन्यांनी केली आहे. चार्जिंग स्टेशन्सची निर्मिती आणि ती चालवण्यासाठी विशेष निधीची घोषणा बजेटमध्ये होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/ऑटो/
EV गाड्या आणखी स्वस्त होणार का, बजेटमधून मिळेल दिलासा? 5 मोठी कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल