TRENDING:

4 प्रकारचं असतं पेट्रोल; तुमच्या कारसाठी कोणतं बेस्ट इथं पाहा

Last Updated:

आपल्या गाडीसाठी योग्य प्रकारचं पेट्रोल निवडणं, फार गरजेचं आहे. पेट्रोलचा प्रकार त्याच्या ऑक्टेन रेटिंग आणि त्यातील अ‍ॅडिटिव्हवर अवलंबून असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कोणत्याही गाडीमध्ये इंधन असल्याशिवाय ती चालत नाही. सामान्यपणे, सर्व टू-व्हिलरमध्ये पेट्रोल वापरलं जाते तर चारचाकी गाड्यांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल वापरले जाते. पेट्रोलचा विचार केला तर त्याचे अनेक प्रकार असतात. त्यामुळे आपल्या गाडीसाठी योग्य प्रकारचं पेट्रोल निवडणं, फार गरजेचं आहे. पेट्रोलचा प्रकार त्याच्या ऑक्टेन रेटिंग आणि त्यातील अ‍ॅडिटिव्हवर अवलंबून असतो. पेट्रोलचे मुख्य प्रकार आणि त्यांची माहिती येथे देण्यात आली आहे.
सध्या अमेरिकेत एक लिटर पेट्रोल 0.96 डॉलरमध्ये उपलब्ध आहे. भारतीय रुपयात बघितले तर तिथे पेट्रोलची किंमत 80 रुपये प्रति लिटर आहे.
सध्या अमेरिकेत एक लिटर पेट्रोल 0.96 डॉलरमध्ये उपलब्ध आहे. भारतीय रुपयात बघितले तर तिथे पेट्रोलची किंमत 80 रुपये प्रति लिटर आहे.
advertisement

1) रेग्युलर पेट्रोल (87 ऑक्टेन):

उपयोग : हे सर्वात सामान्य आणि स्वस्त प्रकारचं पेट्रोल आहे. सामान्य कारमध्ये त्याचा वापर होते. लहान आणि मध्यम श्रेणीच्या इंजिनसाठी योग्य आहे.

फायदे : कमी किंमत आणि सर्वसामान्य कारसाठी योग्य.

तोटे : जर तुमच्या कारचे इंजिन हाय परफॉर्मन्स किंवा टर्बोचार्ज केलेलं असेल तर हे पेट्रोल योग्य ठरणार नाही.

advertisement

2) प्रीमिअम पेट्रोल(91 किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्टेन):

उपयोग : स्पोर्ट्स कार किंवा लक्झरी वाहनांसारख्या हाय परफॉर्मन्स इंजिन असलेल्या वाहनांसाठी हा प्रकार वापरला जातो.

फायदे : इंजिन परफॉर्मन्स सुधारतो, नॉकिंगला प्रतिबंध होतो आणि इंजिनचे आयुष्य वाढतं.

तोटे : हे रेग्युलर पेट्रोलपेक्षा जास्त महाग आहे. तुमच्या कारला त्याची गरज नसल्यास पैसे वाया जाऊ शकतात.

advertisement

3) मिड-ग्रेड पेट्रोल (89 ऑक्टेन):

उपयोग : हे पेट्रोल अशा कारसाठी योग्य आहे, ज्यांना सामान्य आणि प्रीमिअम दरम्यान ऑक्टेन गरजेचा असतो.

फायदे : हाय ऑक्टेन रेटिंगपेक्षा चांगली कामगिरी आणि प्रीमिअमपेक्षा स्वस्त.

तोटे : हे सर्व कारसाठी योग्य नाही. बहुतांश ग्राहक रेग्युलर किंवा प्रीमिअम पेट्रोल निवडतात.

4) इथेनॉल-ब्लेंडेड पेट्रोल (E10, E15, E85):

advertisement

उपयोग : या पेट्रोलमध्ये 10 टक्के, 15 टक्के किंवा 85 टक्क्यांपर्यंत इथेनॉल असते. यामुळे इंधनखर्च कमी होतो आणि ते पर्यावरणास अनुकूल आहे.

फायदे : प्रदूषण कमी होण्यास मदत होते आणि पेट्रोलची किंमत कमी असते.

तोटे : इथेनॉल-ब्लेंडेड पेट्रोल सर्व वाहनांसाठी, विशेषतः जुन्या कारसाठी योग्य नाही.

तुमच्या कारसाठी कोणते पेट्रोल चांगलं आहे?

advertisement

रेग्युलर पेट्रोल : तुमच्या कारच्या मॅन्युअलमध्ये 87 ऑक्टेन किंवा त्याहून कमी दर्जाचं पेट्रोल वापरायला सांगितलं असेल तर ते बरोबर असेल.

प्रीमियम पेट्रोल : जर तुमच्या कारच्या इंजिनला हाय परफॉर्मन्स गरज असेल किंवा मॅन्युअलमध्ये 91 ऑक्टेन किंवा त्याहून अधिकची शिफारस केली असेल, तर प्रीमियम पेट्रोल वापरा.

मिड-ग्रेड पेट्रोल : तुमच्या कारला 89 ऑक्टेनची गरज असेल किंवा तुम्हाला अधिक चांगला परफॉर्मन्स पाहिजे असेल तर हे पेट्रोल वापरा

इथेनॉल-ब्लेंडेड पेट्रोल : जर तुमची कार इथेनॉल-ब्लेंडेड इंधनाला सपोर्ट करत असेल आणि तुम्ही पर्यावरणाप्रती संवेदनशील असाल तर हा प्रकार तुम्ही वापरू शकता.

तुमच्या कारच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचनांनुसार योग्य पेट्रोल निवडणे फार महत्वाचे आहे. यामुळे कारच्या इंजिनचं आयुष्य आणि कार्यक्षमता परिणाम होतो.

मराठी बातम्या/ऑटो/
4 प्रकारचं असतं पेट्रोल; तुमच्या कारसाठी कोणतं बेस्ट इथं पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल