एनआयए पद भरती 2024 च्या माध्यमातून एकूण 40 पदांवर प्रतिर्नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांवर पदवीधारक उमेदवार अर्ज दाखल करून नोकरी मिळवू शकतात. येत्या 2 मार्चपर्यंत या पदांवर अर्ज करता येईल. जर तुम्हालासुद्धा एनआयएच्या या पद भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर पुढे दिलेल्या सगळ्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.
एनआयएमध्ये या पदांवर होतेय प्रतिनियुक्ती
advertisement
अधिकृत सूचनेनुसार, या भरती अंतर्गत असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड – I आणि अपर डिव्हीजर क्लार्क या पदांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात येणार आहे.
एनआयएमध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा
ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे, त्यांचं वय अर्ज मिळण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 56 वर्षांपेक्षा अधिक नसावी.
एनआयएमध्ये नोकरीनंतर मिळेल एवढा पगार
एनआयए पदभरती 2024 साठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांना पुढे नमूद केल्याप्रमाणे वेतन दिलं जाणार आहे.
असिस्टंट – पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 06 नुसार, 35,400 रुपयांपासून 1,12,400 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकेल.
स्टोनोग्राफर ग्रेड – l - पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 06 नुसार, 35,400 रुपयांपासून 1,12,400 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकेल.
अपर डिव्हिजन क्लार्क - पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल 04 अंतर्गत मासिक वेतन 25,500 रुपयांपासून 81,100 रुपयांपर्यंत मिळू शकेल.
जाहिरात आणि सूचना पुढच्या लिंकवर पाहा.
अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार आवश्यक त्या डॉक्युमेंट्ससह अर्ज भरून अंतिम मुदतीआधी पाठवावा. अर्ज पाठवण्यासाठी पत्ता - एसपी (प्रशासन), एनआयए मुख्यालय, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली - 110003
