TRENDING:

Indian Army: सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, दोन ठिकाणी रॅलीचे आयोजन

Last Updated:

Indian Army: या रॅलीद्वारे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. सैन्यात अग्निवीर आणि नियमित संवर्गासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी लष्कर भरती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. रॅलीचा पहिला टप्पा पुण्यात 9 ते 19 ऑगस्ट दरम्यान आणि दुसरा टप्पा नागपूरमध्ये 3 ते 13 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.
Indian Army: सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, दोन ठिकाणी रॅलीचे आयोजन
Indian Army: सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, दोन ठिकाणी रॅलीचे आयोजन
advertisement

संरक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, जुलै 2025 मध्ये घेण्यात आलेल्या समायिक प्रवेश परीक्षेत (CEE – Common Entrance Exam) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या रॅलीमध्ये सहभागी होता येणार आहे. या रॅलीत उमेदवारांची फिजिकल फिटनेस आणि वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतात केली पपई लागवड, तरुण शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न

advertisement

उमेदवारांना त्यांच्या नोंदणी दरम्यान दिलेल्या ई-मेल आयडीवर रॅलीचे प्रवेशपत्र पाठवण्यात आले आहे. शिवाय, सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील ही प्रवेशपत्रं डाउनलोड करता येतील. प्रवेशपत्र मिळण्यात काही अडचण आल्यास, पुणे कॅम्प आणि कामठी कॅम्प येथील संबंधित भरती कार्यालयांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत घेता येणार आहे, असं संरक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

advertisement

पुण्यातील लष्कर भरती रॅली ही पुणे भरती कार्यालयाद्वारे आयोजित केली जात आहे. ही रॅली दिघी येथील बॉम्बे इंजिनीअर ग्रुप ट्रेनिंग बटालियन-2 मध्ये होणार आहे. या रॅलीमध्ये पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि सोलापूर या जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांना सहभागी होता येईल.

नागपूरमधील लष्कर भरती रॅली ही नागपूर लष्कर भरती कार्यालयाद्वारे आयोजित केली जाणार आहे. ही रॅली कामठी येथील गार्ड्स रजिमेंटल सेंटरच्या अल्बर्ट एक्का स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. या रॅलीमध्ये नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

advertisement

या रॅलीद्वारे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या यशस्वीरीत्या पार केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.

मराठी बातम्या/करिअर/
Indian Army: सैन्यात भरती होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, दोन ठिकाणी रॅलीचे आयोजन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल