तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये रूफटॉप पूल असल्याचं ऐकलं असेल. पण तुम्ही कधी घराच्या छतावर पूल बांधून त्यामध्ये मासेमारी करण्याबद्दल ऐकलं आहे का? कदाचित अनेकजण या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं देतील. पण 2019 पासून आसाममधील डॉ. अमरज्योती कश्यप हेच करत आहेत. गुवाहाटी येथील डॉ. कश्यप हे पर्यावरण शास्त्रज्ञ असून त्यांनी त्यांच्या घराच्या छतावर मत्स्यपालन करताना या व्यवसायाची संकल्पनाच बदलली आहे.
advertisement
3 महिन्यात 4 लाखांची कमाई; या भाजीच्या लागवडीमुळे बळीराजाचं नशीब पालटलं
जागेचा असाही उपयोग
डॉ. कश्यप यांनी त्यांच्या घराच्या छतावर रूफटॉप फिशिंग सुरू केलंय. रूफटॉप फिशिंग म्हणजे घराच्या छतावरील मर्यादित जागेत मत्स्यपालन करणे होय. ज्या शेतकऱ्यांना उपभोगासाठी किंवा व्यावसायिक स्तरावर मत्स्यशेती करायची आहे, पण त्यांच्याकडे पुरेशी जागा नाही, त्यांच्यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरू शकते. याबाबत डॉ. कश्यप म्हणतात की, ‘ज्या शहरांमध्ये पारंपरिक मत्स्यशेतीसाठी पुरेशी जमीन नाही, अशा शहरांमध्ये छतावर मासेमारी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.’
डॉ. कश्यप यांनी याबाबत ‘द बेटर इंडिया’ला माहिती देताना सांगितलं होतं की, ‘छतावरील तलावात मत्स्यशेती करून ते मासे तुम्ही खाऊ शकता, शिवाय विकूही शकता. तसेच यामुळे तुमच्या घराच्या छताचं सौंदर्य वाढण्यास मदत होते. मत्स्यशेतीसाठी नैसर्गिक तलाव बांधण्यासाठी मी माझ्या घराच्या छताची 1,000 चौरस फूट जागा वापरली आहे. हा तलाव 14 फूट रुंद, 28 फूट लांब आणि 4 फूट खोल आहे. सध्या या तलावात गोल्डन कार्प प्रजातीच्या माशाचे प्रजनन केलं जातं. मी या तलावाच्या बाजुला आराम करता यावा, यासाठी व्यवस्था केली आहे. येथे नाश्ता करताना एक मनमोहक दृश्याचा आनंद घेता येतो.’
'या' योजनेमुळे शेतकरी कुटुंब मालामाल; आता वर्षाला 12 लाख झालं उत्पन्न
शाश्वत सराव जे अन्न गुणवत्ता वाढवते
एप्रिल 2019 मध्ये डॉ. कश्यप यांनी गुवाहाटी येथे त्यांच्या दोन मजली इमारतीच्या छतावर मत्स्यशेतीसाठी तलाव तयार केला. प्रदूषण, रसायने आणि जास्त मासेमारी यासारख्या माशांच्या वापराशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करणे, ही त्यामागची कल्पना होती. डॉ. कश्यप यांनी छतावर तयार केलेल्या मत्स्यशेतीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, नियंत्रित वातावरणात माशांना वाढण्यासाठी डॉ.कश्यप यांनी अभ्यास करून नैसर्गिक तलाव तयार केला. तलावातील परिसंस्थेवर नियंत्रण राहावे, यासाठी मासे कोणत्या वनस्पतींसह वाढतात आणि ते काय खातात, याचा अभ्यासही डॉ.कश्यप यांनी केला, व त्यानुसार नियोजन केलं.
डॉ.कश्यप हे माशांना सेंद्रिय वनस्पती आणि अन्न खायला देतात. ज्यामुळे माशांचे आरोग्य चांगले राहते, शिवाय तलावातून रासायनिक मुक्त आणि निरोगी मासे खाण्यासाठी सहज उपलब्ध होतात. जे बाजारात व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या माशांपेक्षा खाण्यासाठी अधिक योग्य आहेत. त्यांचा हा अभिनव दृष्टीकोन शाश्वत पद्धतींचं महत्त्व अधोरेखित करतो. एखादी व्यक्ती स्वतःच्या अन्नाची गुणवत्ता कशी वाढवू शकतात, यासाठी हे एक उत्तम उदाहरण आहे.
दरम्यान, महागाईच्या या जमान्यात शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचं झालं आहे. त्यांच्यासाठी मत्स्यशेती हा चांगला पर्याय आहे. मत्स्यशेतीसाठी पुरेशी जागा नसेल, तर घराच्या छतावर मत्स्यशेती करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो.