3 महिन्यात 4 लाखांची कमाई; या भाजीच्या लागवडीमुळे बळीराजाचं नशीब पालटलं

Last Updated:

सुरुवातीला या भाजीला 60 रुपये किलोचा भाव मिळाला. मात्र त्यानंतर भाव जरा घसरला. मात्र यातूनही 50 हजारांची गुंतवणूक करून त्यांना 3 लाख रुपयांचं चांगलं उत्पन्न मिळत आहे.

तुम्ही शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर एकदा या भाजीची लागवडही करून पाहा.
तुम्ही शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर एकदा या भाजीची लागवडही करून पाहा.
धीरज कुमार, प्रतिनिधी
किशनगंज, 16 ऑगस्ट : कारलं म्हटलं की भले-भले नाक, तोंड मुरडतात. तिखटातलं तिखट खाणाऱ्या व्यक्तीदेखील कडू कारल्याचं नाव ऐकूनच तोंड कडू करतात. सुगरण स्त्रिया मात्र कारल्याचा कडवटपणा पूर्णपणे कसा काढता येईल, याचे नानाविध उपाय शोधत असतात. तर, कडवटपणा हीच कारल्याची खासियत आहे, असंही काहीजणांचं मत असतं.
हेच कडू कारलं तुमचं नशीब पालटवू शकतं बरं का? तुम्ही शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर एकदा या भाजीची लागवड करून पाहा. बिहारच्या किशनगंज जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या आयुष्यात कारल्यामुळे जणू गोडवा आला. 3 बीघे जागेत कारल्याचं उत्पादन घेऊन ते लाखोंची कमाई करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच कारल्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती, त्यातून आता त्यांना 2 ते 3 लाखांचं उत्पन्न मिळत आहे.
advertisement
विशेष म्हणजे कारल्याचा हंगाम हा केवळ 3 ते 4 महिने असतो. अनेकजण आहारात हंगामी फळं आणि भाज्यांचा समावेश करणं पसंत करतात. परिणामी कारल्याला बाजारपेठेत चांगली मागणी मिळते. शेतकरी खगेश सिंह यांना सुरुवातीला या शेतीत काही अडचणी आल्या, मात्र कृषी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी विशिष्ट प्रकारच्या कारल्याचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आणि त्यांचं शेत जणू बहरून आलं.
advertisement
खगेश सांगतात, त्यांनी आतापर्यंत आपल्या शेतातून 9 वेळा कारल्याची तोडणी केली. सुरुवातीला कारल्याला 60 रुपये किलोचा भाव मिळाला. मात्र त्यानंतर भाव जरा घसरून 30 ते 40 रुपये किलोवर आला. मात्र यातूनही 50 हजारांची गुंतवणूक करून त्यांना 3 लाख रुपयांचं चांगलं उत्पन्न मिळत आहे.
मराठी बातम्या/देश/
3 महिन्यात 4 लाखांची कमाई; या भाजीच्या लागवडीमुळे बळीराजाचं नशीब पालटलं
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement