शेती मोसंबीची आणि टर्नओव्हर चंदनाचा; शेतकऱ्यांनी कशी साधली ही किमया

Last Updated:
या गावातील प्रत्येक शेतकरी हा मोसंबीची शेती करतो. मोसंबीमधून गावाचं वार्षिक टर्नओव्हर कोटींपर्यंत पोहचलंय.
1/5
 राज्यात शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतांना शेतकरी दिसतात.  जिल्ह्यातल एक मोसंबीचं गाव आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी हा मोसंबीची शेती करतो.
राज्यात शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतांना शेतकरी दिसतात. बीड जिल्ह्यातल एक मोसंबीचं गाव आहे. या गावातील प्रत्येक शेतकरी हा मोसंबीची शेती करतो.
advertisement
2/5
बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग हे गाव मोसंबीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. जवळपास 5 हजार लोकसंख्येच्या या गावात पूर्वी सामान्य पद्धतीनं शेती केली जात होती. मात्र, 2002 साली गावातील अनिल पवळ, संभाजी पवळ, या दोन शेतकऱ्यांनी एकत्र येत सहा एकर शेतीवर मोसंबीची लागवड केली.

3/5
त्यावेळी शेतात फवारणीसाठी कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान अवगत नव्हते यांनी मेहनत करत मोसंबीच्या रोपाचे बागेत रूपांतर केले त्यांना त्यावेळी वर्षाकाठी एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.पवळ यांनी मोसंबी शेतीचा केलेला हा प्रयोग गावात चांगलाच हिट झाला.

4/5
त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट देत हा प्रयोग समजून घेतला. त्यांच्या प्रयोगाचं अनुकरण केलं. भुईमूग, जवारी, कापूस, सोयाबीन, या पारंपारिक पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोसंबीला प्राधन्य दिलं.

5/5
आजा शिरसमार्ग आणि परिसरातील चार गावांमध्ये मिळून जवळपास बाराशे हेक्टर परिसरात मोसंबीची लागवड केली जाते. मोसंबी लागवडीतून या गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी लाखो रुपये मिळतात. मोसंबीमधून गावाचं वार्षिक टर्नओव्हर हे 30 ते 35 कोटींपर्यंत पोहचलंय.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement