TRENDING:

एकही रुपया न देता, अगदी मोफत करू शकता NEET ची तयारी, सहज मिळतील 600+ मार्क्स

Last Updated:

NEET UG 2025 परीक्षेची तयारी मोफत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. NCERT पुस्तके ही तयारीसाठी सर्वात महत्त्वाची आहेत, कारण NEET चा अभ्यासक्रम त्यावर आधारित आहे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्या विद्यार्थ्यांनी नुकतीच किंवा यावर्षी विज्ञान शाखेतून बारावी ची परीक्षा दिली आहे, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी सध्या NEET परीक्षेची तयारी करत आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी NEET UG परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. देशभरात NEET साठी अनेक कोचिंग सेंटर्स आहेत. पण त्यांची फी जास्त असल्यामुळे, सगळ्यांना तिथे प्रवेश घेणे शक्य होत नाही. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही कोचिंगशिवाय म्हणजेच मोफत NEET 2025 ची तयारी करू शकता.
Free NEET coaching
Free NEET coaching
advertisement

अनेक राज्य सरकारे NEET UG साठी मोफत कोचिंग देतात. यात प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला एक रुपयाही भरावा लागत नाही. पण काही कारणास्तव जर तुम्हाला मेडिकल प्रवेश परीक्षेच्या मोफत कोचिंगमध्ये प्रवेश घेता आला नाही, तर काळजी करण्याची गरज नाही. अनेक इतर पर्याय आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही NEET UG परीक्षेची तयारी अगदी मोफत करू शकता (Entrance Exams after 12th). जाणून घ्या NEET UG 2025 परीक्षेची तयारी एकही पैसा खर्च न करता कशी करावी.

advertisement

NEET UG ची मोफत तयारी कशी करावी?

NEET चा जगातील सर्वात कठीण परीक्षांच्या यादीत समावेश होतो. दरवर्षी 15-20 लाख विद्यार्थी NEET UG परीक्षेला बसतात. अशा परिस्थितीत, मेडिकल प्रवेश परीक्षेत स्पर्धेची पातळी खूप वाढते. NEET UG ची मोफत तयारी कशी करावी हे जाणून घ्या.

1) NCERT ची पुस्तके 

NEET चा अभ्यासक्रम मुख्यत्वे NCERT च्या अकरावी आणि बारावी च्या पुस्तकांवर आधारित असतो. ही पुस्तके पूर्णपणे वाचा. बहुतेक प्रश्न याच पुस्तकांमधून विचारले जातील. जर तुमच्याकडे पुस्तके नसेल, तर तुम्ही NCERT च्या अधिकृत वेबसाइट ncert.nic.in वरून मोफत PDF डाउनलोड करू शकता.

advertisement

2) ऑनलाइन मोफत संसाधने 

अनेक YouTube चॅनेल NEET च्या तयारीसाठी मोफत व्हिडिओ लेक्चर्स पुरवतात. यात विषयानुसार स्पष्टीकरण आणि सरावाचे प्रश्न असतात. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी YouTube हे उत्तम मोफत व्यासपीठ आहे. खान सर यांच्यासह अनेक शिक्षक YouTube वर व्हिडिओ अपलोड करतात.

3) मोफत ॲप्स आणि वेबसाइट्स

advertisement

  • NEETPrep : त्यांच्या वेबसाइट आणि YouTube चॅनेलवर मोफत कोर्सेस आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत.
  • Topper Learning : काही मोफत साहित्य आणि सरावाचे प्रश्न उपलब्ध आहेत.

4) मागील वर्षांची प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट

NEET च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) ऑनलाइन मोफत उपलब्ध आहेत. तुम्ही त्या डाउनलोड करून सराव करू शकता. नमुना प्रश्नपत्रिका NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर देखील मिळू शकतात. मोफत मॉक टेस्टसाठी सरकारी ॲप 'NTA अभ्यास' डाउनलोड करा.

advertisement

5) ग्रुप स्टडी

तुमच्या मित्र किंवा वर्गमित्रांचा एक ग्रुप तयार करा. एकमेकांना शिकवा आणि शंकांचे निरसन करा. यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतील.

6) लायब्ररीमध्ये अभ्यास

जर तुमच्याकडे इंटरनेटची उपलब्धता कमी असेल, तर तुमच्या जवळच्या लायब्ररीमध्ये जा आणि NCERT ची पुस्तके आणि संदर्भ साहित्य वाचा.

7) वेळेचे व्यवस्थापन आणि स्वयंअध्ययन

एक वेळापत्रक तयार करा आणि दररोज 8-10 तास अभ्यास करा. जीवविज्ञानावर जास्त लक्ष केंद्रित करा (कारण 50% गुण त्यासाठी राखीव आहेत), पण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रलाही दुर्लक्षित करू नका. स्वतःच्या नोट्स तयार करा आणि त्यांचा रिव्हिजनसाठी वापर करा.

8) ऑनलाइन फोरम आणि ग्रुप्स

Telegram, WhatsApp किंवा Facebook वर NEET च्या तयारीसाठी असलेले मोफत ग्रुप जॉईन करा. तिथे अभ्यास साहित्य, PDFs आणि टिप्स शेअर केल्या जातात.

9) सरकारी कोचिंग मोफत उपलब्ध असेल

अनेक सरकारे मोफत NEET कोचिंग पुरवतात. तेथील शिक्षक तुम्हाला संकल्पना इत्यादी समजून घेण्यास मदत करू शकतात.

टीप : दररोज किमान 50-100 MCQs चा सराव करा आणि तुमच्या कमजोर विषयांवर काम करा. 'NEET free study material PDF' असे इंटरनेटवर शोधल्यास तुम्हाला भरपूर संसाधने मिळतील.

हे ही वाचा : गणिताशिवाय BBA, BCA पूर्ण करता येतं का? ॲडमिशन घेण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, नाहीतर...

हे ही वाचा : Learn English : मुलाखतीसाठी निघालाय अन् इंग्रजी येत नाहीये? 'ही' 20 वाक्यं लक्षात ठेवा अन् नोकरी मिळवा!

मराठी बातम्या/करिअर/
एकही रुपया न देता, अगदी मोफत करू शकता NEET ची तयारी, सहज मिळतील 600+ मार्क्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल