जर्मन भाषेचे प्रमाणपत्र
जर्मनीत नोकरीसाठी जाण्याकरता जर्मन भाषेचे प्रशिक्षण गरजेचे आहे. ‘ग्योथं इन्स्टिट्यूट’ द्वारे देण्यात येणारी प्रमाणपत्रे जर्मनीत वैध मानली जातात. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्योथ्यं इन्स्टिट्युट यांच्याकडून घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार, प्रशिक्षण झाल्यानंतर ग्योथ्यं इन्स्टिट्युटकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना सहाय्य केले जाणार आहे.
Vande Bharat: छ. संभाजीनगरला लवकरच मोठं गिफ्ट, मुंबईसाठी धावणार स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस!
advertisement
1000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
‘बार्टी’कडून राज्यात विविध ठिकाणी 1 हजार विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये अहिल्यानगर 50, दापोडी 120, हिंगोली 30, नागपूरमधील दोन केंद्रांवर प्रत्येकी 105, नाशिक 100, नवी मुंबई 50, छत्रपती संभाजीनगर 160, ठाणे 100 आणि पुण्यातील केंद्रावर 180 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना मदत करणार
‘बार्टी’कडून प्रशिक्षणार्थींना पासपोर्ट, व्हिसा आणि अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी मदत केली जाणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी जर्मनीला जाऊ शकतील. बार्टीच्या माध्यमातून एक हजार विद्यार्थी जर्मन भाषा शिकत असून हा अभ्यासक्रम साडेतीन महिन्यांचा आहे. पुढील महिन्यात जर्मन भाषा अभ्यासक्रमाची पहिली तुकडी बाहेर पडणार असल्याची महिती महासंचालक सुनील वारे यांनी दिली.