करौली : भारतीय हवाई दलात अग्नीवीर व्हायची सुवर्ण संधी तरुणांना उपलब्ध झाली आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर भरतीच्या ऑनलाइन अर्जासंबंधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 17 जानेवारी 2024 पासून सुरू झाली आहे.
यापूर्वी हवाई दल अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 फेब्रुवारी होती. आता हवाई दलाने 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे तरुणांना 11 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
advertisement
काय आहे नियमावली -
अजूनही ज्यांनी भारतीय हवाई दलात अग्नीवीरसाठी अर्ज केलेला नसेल किंवा अर्जापासून जे वंचित राहिलेले इच्छुक अविवाहित स्त्री-पुरुष उमेदवार असतील, त्यांनी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात. या भरतीशी संबंधित सर्व नियमांची तपशीलवार माहिती त्यांना वेबासाईटवर मिळेल आणिआणि त्यांचे ऑनलाइन अर्ज ते सबमिट करू शकतात.
गर्लफ्रेंडचं लग्न दुसऱ्या कुणाशी ठरलं, तिने विरोधही केला नाही, बॉयफ्रेंडने जे केलं ते हादरवणारं
जन्मतारखेनुसार भरतीसाठी पात्र -
ऑनलाइन नोंदणीसाठी, 2 जानेवारी 2004 ते 2 जानेवारी 2007 दरम्यान जन्मलेले अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार (दोन्ही तारखांसह) या भरतीसाठी पात्र असतील. तसेच त्यांनी 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह किंवा इंग्रजी विषयातही 50 टक्के गुण असणए अनिवार्य आहे किंवा 3 वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
