Mumbai Market : ट्रेंडी एस्थेटिक सिरेमिक कप, फक्त 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट

Last Updated:

घरगुती वस्तूंमध्ये आकर्षक डिझाईन आणि आधुनिक लूक यांचा समतोल साधणाऱ्या वस्तूंना मागणी वाढत आहे.

+
News18

News18

मुंबई : आजच्या तरुण पिढीला फक्त उपयोगी नव्हे तर सौंदर्यपूर्ण वस्तू घरात असाव्यात असं वाटतं. घरगुती वस्तूंमध्ये आकर्षक डिझाईन आणि आधुनिक लूक यांचा समतोल साधणाऱ्या वस्तूंना मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये एस्थेटिक सिरेमिक कप आणि बाउल्सचा जबरदस्त ट्रेंड पाहायला मिळत आहे.
क्रॉफर्ड मार्केटमधील आर ब्यूटी आर वर्ल्ड या दुकानाबाहेरील सिरेमिक वस्तूंच्या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. येथे विविध आकार, रंग आणि डिझाईनचे कप-बाउल्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. सिरेमिक कप 250 रुपयांना तर क्लाउड कप आणि बशी 350 रुपयांना मिळत आहेत. याशिवाय कलरफुल बाउल्स फक्त 200 रुपयांत मिळतात. घरातील स्वयंपाकघर अधिक आकर्षक दिसावे म्हणून चहा, कॉफी, साखर आणि मीठ ठेवण्यासाठी खास बरण्या 350 रुपयांना विक्रीस आहेत.
advertisement
या वस्तूंचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक आणि पेस्टल रंगसंगती, मॅट फिनिश, स्पॉटेड आणि हँड-पेंटेड डिझाईन्स. या डिझाईनमुळे कप-बाउल्स प्रत्येक प्रकारच्या किचन डेकोरमध्ये सहज मिसळतात. याशिवाय हे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन-सेफ असल्यामुळे केवळ चहा-कॉफीसाठीच नव्हे तर सूप, केक बेकिंग आणि सर्व्हिंगसाठीही उत्तम पर्याय ठरत आहेत.
advertisement
या सिरेमिक वस्तू टिकाऊ आहेत आणि त्यांचा रंग आणि चमक दीर्घकाळ कायम राहतो. विशेष म्हणजे जास्त प्रमाणात खरेदी केल्यास स्टॉलवर डिस्काउंटची सुविधा देखील मिळते. त्यामुळे घर सजवण्याची आवड असणारे तसेच भेटवस्तू म्हणून काहीतरी वेगळं शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. परवडणाऱ्या दरात आधुनिक डिझाईन, दर्जेदार साहित्य आणि सौंदर्याची जोड मिळत असल्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमधील हे सिरेमिक कप-बाउल्स सध्या मुंबईकरांच्या होम डेकोर शॉपिंग लिस्ट मध्ये अव्वल स्थानावर आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mumbai Market : ट्रेंडी एस्थेटिक सिरेमिक कप, फक्त 250 रुपयांत करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement