प्रिया सिंह या 2018 च्या बॅचच्या PPS (प्रोव्हिन्शिअल पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत. रिपोर्ट्सनुसार, त्या आधीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे शालेय शिक्षण उत्तर प्रदेशातील बरेली शहरात पूर्ण झाले. त्यांनी मेरठमधील चौधरी चरण सिंह विद्यापीठातून बीएससीमध्ये डिग्री पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी फिजिक्समध्ये एमएससी डिग्री पूर्ण केली. पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्या विद्यापीठाच्या टॉपर होत्या आणि त्यांना राज्याच्या राज्यपालांच्या हस्ते सुवर्णपदकही देण्यात आले होते.
advertisement
प्रिया यांची सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे त्यांनी UPPSC (उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग) परीक्षा दोनदा उत्तीर्ण केली आहे. त्या पहिल्यांदा 2017 मध्ये UPPSC परीक्षेत उत्तीण झाल्या होत्या, त्यानंतर त्यांना इन्कम टॅक्स (IT) विभागात नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी पुन्हा यूपीपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये त्या पुन्हा परीक्षेत पास झाल्या आणि त्यांना डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) पद मिळाले. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की परीक्षेची तयारी करण्यासाठी, त्यांनी सर्वात आधी त्या विषयांवर लक्ष केंद्रित केलं जे त्यांना सोपे वाटले आणि त्यामुळे त्यांना चांगले गुण मिळविण्यात मदत झाली. त्या पुढे म्हणाल्या की, ज्या विद्यार्थ्यांना हा मार्ग निवडायचा आहे त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स तयार कराव्यात आणि वृत्तपत्रं रोज वाचावी.
UPSC Success Story: वडिलांच्या स्वप्नासाठी सोडलं MBBS; UPSC ची तयारी केली, दोनदा नापास, मग...
सध्या प्रिया कानपूर ग्रामीण डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्या बुलंदशहर येथील मानसरोवर कॉलनीत राहतात. त्यांचे वडील रामपाल सिंह हे मथुरेत इन्स्पेक्टर आहेत, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यांचे आजोबा निवृत्त एसएचओ (स्टेशन हाउस ऑफिसर) आहेत.
UPPSC किंवा उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची स्थापना 1 एप्रिल 1937 रोजी करण्यात आली होती. राज्यातील विविध पदांसाठी उमेदवारांची भरती करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. आयोग उत्तर सर्व्हिस कमिशन रेग्युलेशन 1976 अंतर्गत आहे. आयोगाचे मुख्यालय प्रयागराज, उत्तर प्रदेश इथे आहे.