UPSC Success Story: वडिलांच्या स्वप्नासाठी सोडलं MBBS; UPSC ची तयारी केली, दोनदा नापास, मग...
- Published by:Rahul Punde
Last Updated:
UPSC Success Story: प्रत्येकजण आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. पण, जे आपल्या आईवडिलांचा स्वप्ने सत्यात आणतात त्यांचे यश आणखीनच खास बनते. आम्ही तुम्हाला अशाच एका अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत, जिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमबीबीएसचे शिक्षण सोडले.
advertisement
मानसीचे वडील अकाउंटंट आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की त्यांना स्वतः नागरी सेवेत रुजू व्हायचे होते. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. मानसीने बारावीनंतर NEET ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ती एमबीबीएसला प्रवेश घेत होती. पण वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने एमबीबीएस सोडून आर्ट्सला प्रवेश घेतला आणि सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली.
advertisement
advertisement
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच तिने यूपीएससीची परीक्षा दिली. तिने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, पहिल्या वर्षी तिने परीक्षा समजून घेण्यासाठी पेपर दिला होता. तिच्याकडून काही चुका झाल्यामुळे तिला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही. आपल्या चुकांमधून शिकत तिने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली.
advertisement