TRENDING:

कॉलेजनंतर नोकरीची वाटते काळजी? या कोर्स वाल्यांना मिळतोय चांगल्या पगाराचा JOB

Last Updated:

कधीकधी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोक भटकत जातात. अशावेळी करिअर पुन्हा रुळावर येण्यास बराच कालावधी लागतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 09 डिसेंबर : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तरुणांच्या मनात त्यांच्या करिअरबाबत अनेक प्रश्न असतात. काय करावा काय करु नये? तसेच मार्केटमध्ये कोणते जॉब्स आहेत? जास्त पगार कुठल्या कामात मिळेल? असे असंख्य प्रश्न मनात फिरत असतात. कधीकधी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोक भटकत जातात. अशावेळी करिअर पुन्हा रुळावर येण्यास बराच कालावधी लागतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

अनेकवेळा तरुण असे क्षेत्र निवडतात ज्यात त्यांना रस नसतो. अशा स्थितीत पदवी घेतल्यानंतर या अभ्यासक्रमाला भविष्यात फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. अशा परिस्थितीत थोडा विचार करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. चला अशा काही कोर्सबद्दल जाणून घेऊ, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

सायबर सिक्योरिटी

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञांची मागणीही झपाट्याने वाढत आहे. सायबर हल्ल्यांद्वारे दररोज अनेकांना फसवणूककर्ते बळी बनवतात. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षा तज्ञ गोपनीय डेटा हॅक होण्यापासून वाचवतात. इथिकल हॅकिंग कोर्स करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती करू शकता. संगणक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित या दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञांना मोठी मागणी आहे.

advertisement

वेब डिझायनिंग

आजकाल, कोणताही व्यवसाय, मग तो लहान असो वा मोठा, तो अधिक चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी आणि उलाढाल वाढवण्यासाठी वेब डिझायनिंगची गरज आहे. म्हणजेच एका चांगल्या साइटची गरज असते. याशिवाय ऑनलाइन विक्री अपूर्ण आहे. वेब डिझायनिंग आणि वेब डेव्हलपर कोर्स केल्यानंतर तुम्ही नोकरी सोडून स्वतःचे काम सुरू करू शकता.

गुंतवणूक बँकिंग किंवा इनवेस्टमेंट बँकिंग

advertisement

गुंतवणूक बँकिंग हा करिअरचा उत्तम पर्याय ठरेल. हा कोर्स केल्यानंतर चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळणे खूप सोपे होते. तुम्हाला या क्षेत्रात रस असेल तर तुम्ही तुमच्या फर्ममध्ये प्रवेश करू शकता.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशअल इंटेलिजन्स (AI)

तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये चांगले करिअर करू शकता जे प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व पसरवत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करून सायन्सचे विद्यार्थी उत्तम करिअर करू शकतात. या क्षेत्रात खूप पैसा आहे आणि भविष्यात हे क्षेत्र बुम होऊ शकतं.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
कॉलेजनंतर नोकरीची वाटते काळजी? या कोर्स वाल्यांना मिळतोय चांगल्या पगाराचा JOB
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल