रांची : तरुणी आज कोणत्याच क्षेत्रात मागे नाही. तरुणांच्या बरोबरीने तरुणी आज प्रत्येक क्षेत्रात काम करत आहेत. मात्र, एक क्षेत्र असे आहे, ज्यामध्ये अनेक तरुणींना करिअर करावेसे वाटते आणि ते म्हणजे हवाईसुंदरी (एअर होस्टेस). पण एअर होस्टेस कसे बनावे, त्यासाठी काय पात्रता हवी, किंवा त्याचा पगार किती असतो, असे अनेक प्रश्न तरुणींच्या मनात असतात.
advertisement
झारखंडच्या रांची येथील एव्हिएशन तज्ञ संजीत कुमार यांनी एअर होस्टेसच्या करिअरबाबत सर्व माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, एअर होस्टेससाठी फारशी पात्रता किंवा भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र आवश्यक नसते. मात्र, त्यासाठी केवळ शिक्षणच नाही तर शारीरिक तंदुरुस्तीदेखील आवश्यक असते. तुम्ही अभ्यासात फार वेगवान नसाल, पण जर तुमची उंची चांगली नसेल तर तुम्ही एअर होस्टेस बनू शकत नाही. अभ्यासापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वाची इथे कसोटी लागते.
ते पुढे म्हणाले की, एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीममध्ये 12वी करू शकता. तुम्ही फक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, कला किंवा वाणिज्य शाखेतूनच असावे, असे गरजेचे नाही. तुम्हाला बारावीत किमान 50% गुण असावेत. इथे तुमचे व्यक्तिमत्त्व शैक्षणिक पात्रतेपेक्षा खूप महत्त्वाचे आहे.
यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची उंची, तुमचे वजन आणि तुमची पर्सनॅलिटी. कमी कमी तुमची उंची ही 5.5 असावी. तुमचे वजनही समतोल असावे. म्हणजे तुमची उंची जर 5.5 असेल तर तुमचे वजन हे 55 ते 60 किलो असायला हवे. तसेच तुमचे इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असायला हवे. जर तुम्ही इंग्रजी एखाद्या तज्ञाप्रमाणे बोलता, तर तुमचे करिअर त्यात चमकू शकते, असे ते म्हणाले.
संजीत कुमार यांनी सांगितले की, तुम्हाला तुमच्या त्वचेची खूप काळजी घ्यावी लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप गोरे असावे. अजिबात नाही, तुमची त्वचा काळी असली तरीही काही फरक पडत नाही. फक्त तुमची त्वचा निरोगी असावी आणि तुम्हाला काही महत्त्वाचा मेकअप कसा करायचा हे माहित असले पाहिजे. तसेच केसांनाही हेल्दी ठेवायचे आहे. उंची, त्वचा आणि परिपूर्ण केस तुमच्या व्यक्तिमत्वाची शोभा वाढवतात.
या नवाबाचा मृतदेह कबरीतून आला होता बाहेर? काय आहे ही आश्चर्यकारक कहाणी
किती असते सॅलरी -
याबाबतचे शिक्षण आणि पगाराचा विचार केला तर, तुम्ही बारावीनंतर कोणत्याही शिक्षणसंस्थेतून तुम्ही एअर होस्टेसचा कोर्स करू शकतात. हा कोर्स 2 वर्षांचा असतो. तसेच याची वार्षिक फी एक ते दीड लाख रुपये असते. तसेच जर तुम्ही चांगल्या टॉप इन्स्टिट्यूटमधून जर हा कोर्स केला तर तुम्हाला प्लेसमेंटही मिळेल. तसेच सॅलरी म्हणजे पगाराबाबतही अनेकांना प्रश्न असतात. त्यावर ते म्हणाले की, एअर होस्टेसचा पगार कमीत कमी 50 हजार रुपये इतका असतो. तसेच जर तुम्ही आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये जात असाल तर हा पगार वाढून जवळपास 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत जातो.
