महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10वी आणि 12वीचे निकाल 5 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in तसेच शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर देखील तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
अद्याप अधिकृत घोषणा नाही:
महाराष्ट्र बोर्डाने या संदर्भात कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही. ही शक्यता मागील वर्षीच्या निकालाच्या वेळेनुसार वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 10वी चा निकाल 25 मे रोजी जाहीर केला होता. तर इयत्ता 12वी चा निकाल 21 मे रोजी घोषित करण्यात आला होता. 2024 मध्ये महाराष्ट्र एसएससी (10वी) चा उत्तीर्णतेचा दर 95.81 टक्के होता. त्याच वेळी महाराष्ट्र एचएससी (12वी) चा एकूण उत्तीर्णतेचा दर 93.37 टक्के होता.
advertisement
निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाइट्स:
mahahsscboard.in
mahresult.nic.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल तपासू शकतील:
सर्वात आधी mahresult.nic.in या वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
आता विचारलेली माहिती जसे की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका.
यानंतर विद्यार्थी आपला निकाल स्क्रीनवर पाहू शकतील.
विद्यार्थ्यांना अधिकृत घोषणेसाठी महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती बोर्डाद्वारे जाहीर झाल्यास, ती त्वरित विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल.