बारावी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी
भरती प्रक्रियेत सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक पात्रता चाचणी होईल. ही चाचणी 50 गुणांची असेल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा 100 गुणांची द्यावी लागेल. अंतिम निवड ही दोन्ही चाचण्यांतील गुण एकत्र करून केली जाईल. अर्जदाराने बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुरुषांसाठी किमान उंची 165 सेंमी, तर महिलांसाठी 155 सेंमी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे. शारीरिक चाचणीत धाव, गोळाफेक आणि लांब उडी या प्रकारांचा समावेश असेल.
advertisement
वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना दिलासा
सरकारने यंदाच्या पोलिस भरतीसाठी एक वर्षांची अतिरिक्त वयोमर्यादा सवलत लागू केली आहे. त्यामुळे मागील भरतीवेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही यावेळी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांचं पोलिस बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज?
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे.






