TRENDING:

success story : बाळाला जन्म दिला अन् 250 किमी प्रवास करून दिली होती परीक्षा, आज बनली पहिली आदिवासी न्यायाधीश!

Last Updated:

श्रीपती हिने तिच्या प्रसूतीनंतर अवघ्या काही दिवसांतच सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास करुन चेन्नईला जाऊन दिवाणी न्यायाधीश पदासाठीची परीक्षा दिली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तिरुवन्नामलाई : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत नाहीत असं बहुधा कुठलंही क्षेत्र आज जगात नाही. असं असलं तरी अनेक महिलांच्या करिअरमध्ये मातृत्व नावाचा एक विराम कधी तरी येतोच. गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर अनेक महिला करिअरकडे दुर्लक्ष करतात. तामिळनाडूतील श्रीपती मात्र याला अपवाद ठरली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर दोनच दिवसांत 250 किलोमीटर प्रवास करुन श्रीपतीने परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवून देशातली पहिली आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश होण्याचा मान तिने प्राप्त केला.
News18
News18
advertisement

23 वर्षांची श्रीपती ही तमिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पुलियूर या गावातील आदिवासी आहे. तिची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या बळावर तिने हे यश मिळवलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिचं अभिनंदन केलं आहे.

श्रीपती हिने तिच्या प्रसूतीनंतर अवघ्या काही दिवसांतच सुमारे 250 किलोमीटरचा प्रवास करुन चेन्नईला जाऊन दिवाणी न्यायाधीश पदासाठीची परीक्षा दिली होती. आदिवासी म्हणून अत्यंत दुर्गम भागात राहाणाऱ्या, कोणत्याही पायाभूत सुविधा नसलेल्या वर्गातील एका तरुणीला हे यश मिळालेलं बघून मला आनंद आणि अभिमान वाटतो अशा शब्दांत एम. के. स्टॅलिन यांनी श्रीपती हिची प्रशंसा केली आहे. स्टॅलिन आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, द्रमुकच्या द्रविड मॅाडेल सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये तमिळ माध्यमात शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे श्रीपतीची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली. श्रीपती हिची आई आणि पती यांनी तिला दिलेल्या भक्कम पाठिंब्यासाठी मी त्यांचंही अभिनंदन करतो, असंही स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. तमिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीही श्रीपतीचं अभिनंदन केलं. तमिळ माध्यमात शिकल्यामुळे सरकारी योजनेचा लाभ मिळवत श्रीपतीने हे यश संपादित केल्याबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांनी देखील आनंद आणि समाधान व्यक्त केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एस्थेटिक सिरेमिक कप, 250 रुपयांना करा खरेदी, मुंबईतील हे सर्वात स्वस्त मार्केट
सर्व पहा

‘इंडियन एक्सप्रेस’ ने दिलेल्या वृत्तानुसार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीपतीला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. तिच्या गावात तिच्यासाठी कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत गावकऱ्यांनी तिचं स्वागत केलं. श्रीपतीने बीए आणि एलएलबी पर्यंतचं शिक्षण येलागिरी हिल्स इथे पूर्ण केलं.

मराठी बातम्या/करिअर/
success story : बाळाला जन्म दिला अन् 250 किमी प्रवास करून दिली होती परीक्षा, आज बनली पहिली आदिवासी न्यायाधीश!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल