कधीपासून सुरु होतेय परीक्षा?
शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाची मानली जाणारी दहावी बोर्डाच्या परीक्षेची (SSC Exam Date 2024) प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तर लेखी परीक्षा या 1 मार्च ते 26 मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षा अगदी काही दिवसांवर आल्यामुळे विद्यार्थ्यांना हॉल तिकीट हे उद्यापासून उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.
advertisement
आठवीत शिकणाऱ्या मुलाने बनवला सेन्सर गॉगल; अपघात टाळण्यासाठी होणार मदत Video
यावर्षीपासून करण्यात आलाय हा बदल
यावर्षीपासून बोर्डाच्या परीक्षांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मागणी केल्यानंतर यावर्षी परीक्षेचा वेळ हा दहा मिनिटांनी वाढवून देण्यात आला आहे. यासोबतच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जवळपास अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहावं लागणार आहे. परीक्षा मंडळाने याविषयी माहिती दिली आहे.
हॉल तिकीटसाठी अतिरिक्त शुल्क आकारु नये
बोर्डाने सांगितल्या प्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठी सर्व माध्यमिक शाळांना आपल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध असलेले हॉल तिकीट प्रिंट करून द्यावे लागणार आहेत. यासोबतच हॉल तिकीट प्रिंट करुन देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असंही बोर्डाने सांगितलंय. यासोबतच प्रिंट काढलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणं आवश्यक असणार आहे.
