या भरती प्रक्रियेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या कक्षेसाठी शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. राज्यात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या एकूण जागांच्या 80 टक्के जागांवर या भरती प्रक्रियेतून उमेदवारंची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेद्वारे 16 हजार 799 जागांवर मुलाखतीशिवाय उमेदवांची निवड केली जाणार आहे, तर 4 हजार 879 जागांवर मुलाखती घेऊन उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहे. उमेदवारांना पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा 8 फेब्रुवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
advertisement
शिक्षक पदांसाठीच्या बिंदूनामावली जून ते नोव्हेंबर या कालावधीत तपासणी करण्यात आली. मात्र बिंदूनामावलीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदांच्या 10 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता जिल्हा परिषद शाळांमध्ये 70 टक्के पदांवर पदभरती केली जाणार आहे. या जागांबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पवित्र संकेतस्थळावर शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 34 जिल्हा परिषदांतील 12 हजार 522 पदे, 18 महापालिकांतील 2 हजार 951 पदे, नगरपालिकांतील 477 पदे, नगर परिषद शाळांमधील 1 हजार 123 आणि खासगी अनुदानित शळांमधील 5 हजार 728 जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गटनिहाय पदे
पहिली ते पाचवी - 10,240 पदे
सहावी ते आठवी - 8,127 पदे
नववी ते दहावी - 2176 पदे
अकरावी ते बारावी - 1,135 पदे
सर्वाधिक पदे मराठी माध्यमासाठी
माध्यमनिहाय जागांचा विचार केला तर सर्वाधिक पदे मराठी माध्यमातील शाळांमध्ये भरली जाणार असल्याचे दिसून येत आहे. एकूण भरतीतील पदांपैकी मराठी मध्यमासाठी 18 हजार 373 पदे भरली जाणार आहेत, इंग्रजी माध्यमातील 931, उर्दूसाठी 1 हजार 850, हिंदीसाठी 410, गुजरातीसाठी 12, कन्नडसाठी 88, तमीळसाठी 8, बंगालीसाठी 4 आणि तेलुगू माध्यमासाठी 2 जागा उपलब्ध आहेत.
