TRENDING:

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ‘अझोला’, जनावरांचं दूध उत्पादन वाढेल 15 दिवसांत, पीकही येईल जोमात!

Last Updated:

विशेष म्हणजे अझोला माश्यांना खायला दिल्यास त्यांचं वजन लवकर वाढतं, कोंबड्यांना दिल्यास त्यांच्या अंड्यांची गुणवत्ता सुधारते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी
ही वनस्पती प्राण्यांसाठी जशी गुणकारी आहे तशीच पिकांसाठीदेखील उपयुक्त असते.
ही वनस्पती प्राण्यांसाठी जशी गुणकारी आहे तशीच पिकांसाठीदेखील उपयुक्त असते.
advertisement

शाहजहापूर : ‘अझोला’ हे नाव वाचायला, ऐकायला जरा विचित्र वाटत असलं, तरी पाण्यावर उगवणारी ही वनस्पती दुधाळ जनावरांसाठी उत्तम खाद्यपूरक आहे. ‘अझोला’मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, तांबे आणि मग्नेशियम हे उपयुक्त खनिज पदार्थ परिपूर्ण असतात. अझोला चाऱ्यात मिसळून जनावरांना देता येते. विशेष म्हणजे ही वनस्पती उगवायला अत्यंत कमी खर्च येतो. साधारणपणे तांदळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी अझोला आपसूक उगवते.

advertisement

उत्तर प्रदेशमधील कृषी विज्ञान केंद्र शाहजहापूरचे शास्त्रज्ञ डॉ. एनपी गुप्ता यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, अझोला वनस्पती तलाव, झरे आणि खड्ड्यांमध्ये तुंबलेल्या पाण्यात उगवते. प्राण्यांना हिरवा चारा म्हणून ही वनस्पती देता येते. दररोज ही वनस्पती आपल्या जनावरांना दिल्यास 10 ते 15 दिवसांत त्यांच्या दुधात वाढ होते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. विशेष म्हणजे अझोला माश्यांना खायला दिल्यास त्यांचं वजन लवकर वाढतं, असंही डॉक्टर म्हणाले. शिवाय कोंबड्यांना ही वनस्पती दिल्यास त्यांच्या अंड्यांची गुणवत्ता सुधारते.

advertisement

घरात तुळस आहे? मग 'या' गोष्टी माहित असायलाच हव्या! तरच होईल फायदा

अझोलात कोणते पोषक तत्त्व असतात?

डॉक्टरांच्या माहितीनुसार, अझोलात अनेक सूक्ष्म तत्त्व असतात. यात बोरान, आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. शिवाय यात 40 ते 60 टक्के प्रोटीन, 10 ते 15 टक्के खनिज, 7 ते 10 टक्के एमिनो अम्ल आणि जैविक सक्रिय पदार्थ आढळतात. तर यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण अत्यंत कमी असतं.

advertisement

मासे आरोग्यासाठी फायदेशीर, पण शरिराला नेमके फायदे होतात काय?

पिकांसाठीही अझोला रामबाण! 

ही वनस्पती प्राण्यांसाठी जशी गुणकारी आहे तशीच पिकांसाठीदेखील उपयुक्त असते. डॉक्टरांनी सांगितलं की, धान्य पिकांमध्ये 10 ते 15 किलो प्रति एकरच्या प्रमाणात आझोला टाकल्यास 20 दिवसांत पिकांची नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण होते. त्यामुळे चांगलं उत्पादन मिळतं.

कशी उगवेल अझोला?

advertisement

यासाठी 1 मीटर रूंद आणि 3 मीटर लांब काँक्रीटची खाट तयार करा. त्याची खोली 1 फूट असायला हवी. त्यात खाली माती आणि वर पाणी घाला. त्यानंतर 200 ते 400 ग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेट रासायनिक खत पाण्यात टाका. आता यात आपोआप अझोला उगवेल.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/करिअर/
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ‘अझोला’, जनावरांचं दूध उत्पादन वाढेल 15 दिवसांत, पीकही येईल जोमात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल