तुमच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार शाखा निवडा
तुम्हाला कोणता विषय वाचायला आवडतो, तुमचा आवडता विषय कोणता आहे, यावर लक्ष द्या आणि त्या संबंधित शाखा निवडा. जर तुम्हाला काहीच समजत नसेल, तर तुमचा निकाल बघा आणि ज्या विषयात तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळाले आहेत, त्या संबंधित शाखेचा विचार करा. कारण ज्या विषयात तुम्हाला आवड आहे, त्यात तुम्ही नक्कीच चांगली प्रगती करू शकता.
advertisement
दबावाखाली निर्णय घेऊ नका
अनेकदा असं होतं की, विद्यार्थी त्यांच्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन शाखा निवडतात. किंवा तुमचा मित्र-मैत्रिणी जी शाखा निवडतात, तीच तुम्ही निवडता. पण ही चूक करू नका. तुम्हाला जे आवडतं, ज्यात तुमची रुची आहे, तीच शाखा निवडा. कारण आवड असेल तर तुम्ही त्यात मन लावून अभ्यास करू शकता.
तुमचं करिअर आणि भविष्य लक्षात ठेवा
कोणतीही शाखा निवडताना, त्या शाखेत भविष्यात काय संधी आहेत, याचा विचार नक्की करा. अशी शाखा निवडा ज्यात तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे, चांगला पगार मिळू शकतो आणि ज्याची बाजारात जास्त मागणी आहे. यासाठी तुम्ही जाणकारांचा सल्ला घेऊ शकता.
शिक्षकांची मदत घ्या
अकरावीत प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्या शिक्षकांची मदत जरूर घ्या. कारण ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं आहे, त्यांना तुमची क्षमता चांगली माहीत असते. ते तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देऊ शकतील की तुमच्यासाठी कोणती शाखा उत्तम आहे.
तुमचं बजेट लक्षात ठेवा
कोणतीही शाखा निवडण्यापूर्वी तुमच्या घरचं आर्थिक बजेट लक्षात घ्या. तुम्हाला जी शाखा घ्यायची आहे, तिचा खर्च तुमच्या कुटुंबाला परवडेल का? आर्थिक बाजूचा विचार करूनच निर्णय घ्या.
हे ही वाचा : बारावी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनो लाखोंमध्ये कमाई करायचीय? तर 'हे' आहेत करिअरचे 10 बेस्ट पर्याय, वाचा सविस्तर
हे ही वाचा : दहावी-बारावी झालीय, पण करिअर कोणतं निवडायचं? गोंधळात पडू नका, फाॅलो करा 'या' 5 टिप्स, अचूक निर्णय घ्याल!